बारामती, पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा प्रचार दणक्यात सुरु आहे. प्रत्येक गावात सुनेत्रा पवार भेटी देताना दिसत आहे. त्यात अनेकदा आम्हाला साथ द्या विकास नक्की करु, असं म्हणतच मतदानाचं आवाहन करताना दिसत आहे. त्यातच त्या धडाकेबाज भाषणं करताना दिसत आहे. शेवटच्या काही दिवसांत चांगला प्रचार सुरु असल्याचं दिसत आहे. माझ्या सामाजिक कार्याची सुरुवातच मी काटेवाडी गावातून केली आहे. त्यामुळे मला गावापासून शहरापर्यंतच्या प्रश्नांची जाण आहे. या प्रश्नांची सोडवणूक करणं ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवूनच मी काम करत राहीन, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना दिली. 


त्या म्हणाल्या,  सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणुक व्हावी हा अजितदादांचा आग्रह असतो. त्यांच्या कामाचा आवाका आणि पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास हाच मुद्दा घेवून मी ही निवडणूक लढवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्नांची सोडवणूक करण्यावर आपला भर असेल असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.


लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीची वज्रमूठ घट झाल्याचं आपण पाहतो. ही एकजूट कायम ठेवून सर्वांनी आपल्या भागातून घड्याळाला अधिकाधिक मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या उज्वल भवितव्यासाठी घड्याळाला अधिकाधिक मतदान करुन आपल्या हक्काच्या व्यक्तीला खासदार म्हणून तुम्ही संसदेत पाठवाल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी दौऱ्यादरम्यान, नागरीकांच्या भेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी नागरीकांच्या अडचणी समजून घेवून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


अजित पवारांसमोरच सुनेत्रा पवारांचं धडाकेबाज भाषणं


अजित पवारांचा वादा आणि मोदींची गॅरंटी याचा रोज प्रचारादरम्यान प्रत्यय येत आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडू पण तुम्ही आम्हाला मतदान करुन विजयी करा, असं दमदार भाषण बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांसमोरच केलं होतं. 


बारामतीत तगडी लढत


बारामतीत पवार विरुद्ध पवार, अशी लढत होणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. दोघींकडूनही दणक्यात प्रचार सुरु आहे. आता बारामती कोण काबीज करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


इतर महत्वाची बातमी-


कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस


Shrirang Barne : मोदींच्या सभेनंतरही महायुतीत खदखद कायम; प्रचारावर नजर ठेवण्यासाठी दिल्लीचं पथक मावळात पाठवण्याची 'वेळ'.