एक्स्प्लोर
उर्मिला मातोंडकरबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात
धवार पेठेत राहणारा धनंजय कुडतरकर हा पेशाने मेडिकल रीप्रेझेंटेटिव्ह आहे. त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरुन हा भाजपचा कट्टर समर्थक असल्याचं निर्दशात आलं आहे.

पुणे : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या धनंजय कुडतरकरला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बुधवार पेठेत राहणारा धनंजय कुडतरकर हा पेशाने मेडिकल रीप्रेझेंटेटिव्ह आहे. त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरुन हा भाजपचा कट्टर समर्थक असल्याचं निर्दशात आलं आहे. आतापर्यंत कुडतरकरने शरद पवारांपासून ते सोनिया गांधींपर्यंत प्रत्येकावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत.
UNCUT | 'स्ट्रेट आणि थेट उर्मिला मातोंडकर' यांच्याशी खास बातचीत | एबीपी माझा
पण जेव्हा उर्मिला मातोंडकर यांच्यावर अश्लील टिपण्णी पोस्ट केली, तेव्हा पुण्यातल्या महिलांनी थेट त्याच्या घरावरच मोर्चा काढला. पोलीस ठाण्यात धाव घेऊन संरक्षण घेणाऱ्या धनंजय कुडतरकरवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही.
Urmila Matondkar on Loksabha Result | उर्मिला मातोंडकरकडून लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल भाजपचं अभिनंदन | एबीपी माझा
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















