Indian Railway : रेल्वेचा प्रवास हा अतिशय सुरक्षित प्रवास मानला जातो. मात्र, रेल्वे अपघात (Accident) दुर्घटनेच्याही अनेक घटना घडत असतात. मात्र, दोन दिवसांपूर्वी रेल्वे कोचमध्ये अपघात होऊन एका प्रवाशाचा जीव गेल्याने खळबळ उडाली आहे. आता, रेल्वेतील या अपघाताच्या घटनेवर रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. भारतीय रेल्वेने (Railway) बुधवार 26 जून रोजी झालेल्या घटनांवर भाष्य करताना अपघताचं नेमकं कारण काय होतं, यावरुन स्पष्टीकरण दिलं आहे. केरळ ते नवी दिल्ली (Delhi) या मार्गावर धावणाऱ्या एका रेल्वे प्रवासात प्रवाशाच्या अंगावर बर्थ सीट पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची ही घटना होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने हा मृत्यू बर्थ सीट खराब असल्याने झाल्याचे नाकारले आहे. 


केरळहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मिलेनियम सुपरफास्ट एक्सप्रेस (12645) च्या स्लीपर कोचमध्ये बर्थ सीट कोसळल्याची दुर्घटना घडली होती. लोअर बर्थ सीटवर झापलेल्या प्रवाशाच्या अंगावर अप्पर बर्थ सीट पडल्याने 62 वर्षीय प्रवासी अली खान यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गेल्या आठवड्यात घडलेल्या या दुर्घटनेवर आता रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे. 


अली खान हे लोअर बर्थवर आराम करत होते, पण प्रवासात अचानक अप्पर बर्थवर बसलेल्या व्यक्तीसह तो बर्थ लोअर बर्थवरील अली खान यांच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत अली यांना गंभीर जखम झाली होती. विशेष म्हणजे या दुर्घटनेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवासी अली खान यांना रुग्णालयात दाखल केले, त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, उपचाराअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते.


रेल्वे प्रवासात नेमकं काय घडलं


रेल्वे प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, अली खान यांचा मृत्यू रेल्वेचं बर्थ सीट खराब असल्याने झाला नाही. कारण, या दुर्घटनेनंतर संबंधित बर्थ सीटची तपासणी करण्यात आली आहे. तर, अप्पर सीटवर बसलेल्या प्रवासी व्यक्तीने आपले सीट व्यवस्थितपणे साखळीशी बांधून लॉक केले नव्हते. त्यामुळे, ही दुर्घटना घडली अन् अली खान यांचा मृत्यू झाला. रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अधिकृतपणे माहिता देताना म्हटले की, ''संबंधित प्रवासी सीट नंबर 57 (लोअर बर्थ) कोच एस 6 मधून प्रवास करत होते. त्यावेळी, त्याच कोचमधील अप्पर बर्थची साखळी त्यावर बसलेल्या प्रवाशाने व्यवस्थितपणे लॉक केली नव्हती. त्यामुळे, लोअर बर्थवरील प्रवाशासह खाली बसलेल्या प्रवाशांवर ते बर्थ सीट व प्रवासी पडला. रेल्वे स्टाफला रामगुंडम स्टेशनवर सायंकाळी 6.34 वाजता या दुर्घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर, स्टेशन मास्तरांनी रुग्णावाहिका बोलावून प्रवासी अली खान यांना रुग्णालयात पोहोचवले होते'', अशी अधिकृत माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 


हेही वाचा


''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला