Pune PMPML News : पुणे PMPMLकडून (Pune PMPML) प्रवाशांसाठी कायम नवनवे उपक्रम राबवण्यात येत असतात. प्रवाशांना सुखसुविधा मिळाव्यात आणि त्यांचा प्रवास उत्तम होण्यासाठी PMPML प्रशासन कायम तत्पर असतं. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक पर्यटनासाठी प्लॅन आखत आहे. त्यांच्यासाठी PMPML ने पुणेकर आणि पिंपरी-चिंवडकरांसाठी खास सुविधा सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवड  शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळांची सफर नागरिक, पर्यटकांना घडवण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ ही बससेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे


पिंपरी-चिंचवड  शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळांची सफर ही बससेवा 2019 मध्येच सुरु करण्यात आली होती. मात्र या बसला नागरिकांचा फार प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही बससेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून PMPML ने सुरु केलेले उपक्रम यशस्वी होत असताना पाहून त्यांनी ही बससेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


ही बससेवा सुरु करण्यासाठी प्रवासांची मागणी केली होती. त्यासोबतच पुण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला उत्तम आणि कमी पैशात ही सोय उपलब्ध करुन देण्यासाठी PMPML ने ही बस पुन्हा सुरु केली आहे. ही बस AC बस असणार आहे. येत्या 1 मेपासून ही बससेवा सुरु होणार आहे. या बससेवेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन PMPML प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.


या स्थळांवर देणार भेट...


1. भक्ती शक्ती उद्यान (रनिंग)
2. प्रतिशिर्डी शिरगांव
3. देहुगांव (मुख्य मंदिर)
4. देहू गाथा मंदिर 
5. बर्ड व्हॅली
6. सायन्स पार्क 
7. चाफेकर बंधू स्मारक (रनिंग)
8. श्री. मोरया गोसावी मंदिर 
9. मंगलमुर्ती वाडा 
10. चाफेकर वाडा 
11. इस्कॉन मंदिर 
12.  अप्पूघर / दुर्गा टेकडी


तिकीट किती असेल?


‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवेमध्ये प्रतिप्रवासी 500 रुपये  तिकीट दर आकारणी करण्यात येणार आहे. ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बसेसचे तिकीट वितरण निगडी, भोसरी आणि पिंपरी लोखंडे भवन येथील पास केंद्रावर उपलब्ध असणार आहेत. वेळेअभावी पर्यटन ठिकाण वगळले जावू शकते याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. या बसची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 अशी असेल.


ही बातमी वाचा: