Pune Crime news : ग्रामसेवकाला डांबून ठेवून विषारी औषध पाजण्याची भीती दाखवून 73 हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घडना घडली आहे. पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या कुडजे गावात धक्कादायक घटना घटना उघडकीस आली ग्रामसेवक महेशकुमार खाडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास प्रकाश गायकवाड आणि त्याच्या इतर दोन साथीदारांच्या विरोधात उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सायंकाळी ग्रामसेवक खाडे हे कार्यालयीन कामकाज आवरुन घरी जाण्यासाठी निघाले असता कुडजे गावच्या स्मशानभूमीजवळ आरोपींनी त्यांची गाडी अडवली आणि जबरदस्तीने बंद अवस्थेत असलेल्या हॉटेलवर नेले आणि त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर एक औषधाची बाटली दाखवत 'आताच्या आता पैसे दे नाहीतर तुला हे औषध पाजून मारून टाकू' अशी धमकी दिली.
खाडे यांनी स्वतःच्या खात्यात असलेले 49 हजार रुपये आणि आपल्या मित्राकडून आणखी 24 हजार मागून एकूण 73 हजार रुपये आरोपींना दिले. उद्या आणखी दीड लाख रुपये आणून दे नाहीतर तुझ्यासह संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू' अशी धमकी दिली. मुख्य आरोपी सध्या फरार असून इतर दोन आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही.
अशीच दुसरी घटना सिंहगड किल्ल्याच्या परिसरात घडली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन शिवीगाळ करत ग्रामसेवकाला मारहाण केली आहे. मी गावातलाच आहे. काल माझी अडवणूक का केली. तुम्ही कागद द्यायला उशीर केल्याने आमचे काम झाले नाही ', असे म्हणत आरोपीने कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि मारहाण केली. याप्रकरणी लक्ष्मण भगवान शिंगाडे (वय 49, ग्रामसेवक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंद भरत थोपटे याच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सगळ्या प्रकारानंतर आरोपी फरार झाला आहे आणि हा आरोपीला सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. ग्रामसेवक लक्ष्मण शिंगाडे खामगाव मावळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात रोजचं कामकाज करत होते. त्यावेळी आरोपी आनंद थोपटे हा इतर दोन अल्पवयीन साथीदारांसह ग्रामपंचायत कार्यालयात आला आणि मारहाण केली. ग्रामसेवक लक्ष्मण शिंगाडे हे हवेली तालुक्यातील मणेरवाडी आणि खामगाव मावळ या दोन्ही गावाचं काम बघतात. आनंद थोपटे हा कागदपत्रांवर सरपंचांची सही घेण्यासाठी मणेरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात आला होता. कागदपत्रांवर वडीलांचे नाव असल्याने ते प्रत्यक्ष यायला हवेत असे ग्रामसेवकांनी आरोपीला सांगितले मात्र माजी उपसरपंच तानाजी थोपटे यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामसेवकांनी सरपंचांची सही करुन आणण्याची व्यवस्था केली, या प्रकारावरुन राग विकोपाला गेला आणि मारहाण केली.