Pune Crime news : उघड्यावर अंघोळ (Pune Crime news) आणि मासिक पाळीचं रक्त विकण्याच्या (Black magic) प्रकारानंतर पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) गावातून किळसवाणा प्रकार समोर आला आहे. लग्न आणि हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने एका 21 वर्षीय युवकाला मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर, लिंबू-हळद लावून शिव्या-शाप देत त्याला लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पाडल्याची खळबजनक घटना इंदापूर तालुक्यातील काटी गावात घडली आहे. मानवी विष्ठा खाण्यासह लघवी पिण्यास आणि गुद्द्वार चाटण्यास भाग पाडल्याचा प्रकार इंदापुरात घडला आहे. या प्रकरणी 11 आरोपींविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेवरुन सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
तरुणाला करायला लावला अघोरी प्रकार
इंदापुरात 21 वर्षीय तरुणास मानवी विष्ठा खाण्यासह लघवी पिण्यास आणि गुद्द्वार चाटण्यास भाग पाडल्याचा अघोरी प्रकार काटी गावातून समोर आला आहे. याप्रकरणी माढा तालुक्यातील बेंबळे येथील अनिकेत विजय भोसले याने इंदापूर पोलीसात 11 जणांविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये 4 महिलांचा देखील समावेश आहे. आरोपींमध्ये स्वप्नाली कासलिंग शिंदे, दीदी अजय पवार, वंदना बापूराव शिंदे आणि मंदा काळ या 4 महिलांचा समावेश आहे. तर, दिनेश शिंदे, लखन काळे, अजय पवार, बापूराव शिंदे, कासलिंग शिंदे, अतुल काळे यांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे. यापैकी तीन जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तिघांचीही रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेअर
या घटनेतील फिर्यादीचे तीन वर्षांपूर्वी आरोपीच्या मुलीशी जमलेले लग्न हुंड्यामुळे तुटले होते. दरम्यान, या प्रकरणाचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर फिर्यादिने 9 एप्रिल 2023 रोजी मुलीला पळवून नेले. दरम्यान 11 एप्रिलला सबंधित मुलीशी लग्न करायचे असेल तर 5 लाख हुंड्याची मागणी करत आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. याच वेळी या तरुणाशी अमाणूष लज्जास्पद कृत्य करण्यात आले. विशेष म्हणजे नवरी मुलीसह आरोपी महिलांशी देखील या तरुणाला अमाणूष लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल माध्यमांत शेअर करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
संबंधित बातमी-