एक्स्प्लोर

Pune Dove : पुणेकरांनो पारव्यांना दाणे खाऊ घालत आहात तर सावधान; पारव्यांना दाणे टाकल्यास मोजा 500 रुपयांचा दंड

पुणेकर रस्त्यावर दिसणाऱ्य़ा पारव्यांना अनेकदा दाणे टाकता दिसतात. पारव्यांना दाणे टाकणं आता पुणेकांना चांगलंच महागात पडणार आहे. पारव्यांना दाणे टाकताना कोणी आढळल्यास पुणे महापालिकेकडून पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे.

Pune News : पुणेकर रस्त्यावर दिसणाऱ्या (Dove) पारव्यांना अनेकदा दाणे टाकताना दिसतात. पारव्यांना दाणे टाकणं आता पुणेकांना चांगलंच महागात पडणार आहे. पारव्यांना दाणे टाकताना कोणी आढळल्यास पुणे महापालिकेकडून पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. अनेकजण आपल्याला पुण्य मिळेल या भावनेने पारव्यांना खायला घालतात. त्यामुळे या पारव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या पारव्यांमुळे न्यूमोनिया आणि श्वसनाचे इतर विकार बळावत असल्याने महापालिकेकडून या पारव्यांना खायला घालणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे. 

पुण्यातील अनेक परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पारवे दिसून येतात. पुण्यातील वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाट, शनिवार पेठ, नारायण पेठ या ठिकाणी असलेल्या घाट आणि नदीकाठावर अनेक पुणेकर पुण्य मिळावं म्हणून रोज ज्वारीचे दाणे टाकले जातात. त्यामुळे शेकडो पारवे याठिकाणी जमा होतात. जमलेल्या शेकडो पारव्यांच्या थव्यामुळे या परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते. त्यामुळे अनेकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. काही क्षुल्लक पक्षीप्रेमींमुळे अनेक पुणेकरांना या पारव्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेकडून आता दंड आकारण्यात येणार आहे. 

फुफ्फुसाच्या आजारांमध्ये वाढ

शहरात पारव्यांना दाणे टाकणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे अनेक परिसरात पारव्यांचे थवे दिसतात. या पारव्यांच्या थव्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. पक्षांच्या विष्ठेमुळे आणि पंखातून निघणाऱ्या पावडरमुळे माणसाला फुफ्फुसाचे अनेक आजार होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शहरात न्युमोकेनियोसिस, पिस्टोप्लाझमोसिस सारखे आजार वाढत आहेत. त्यामुळे अनेकांना बराच काळ टिकणारा खोकला होत आहे आणि काही ठिकाणी श्वसनाचे आजार पसरत आहेत. 

दाणे दिल्याने पारव्यांची संख्या वाढते

शहरात अनेक ठिकाणी पारव्यांना दाणे टाकले जातात. त्यामुळे पारवे काही विशिष्ट ठिकाणी जमा होतात. मात्र याच दाण्यामुळे पारव्यांची प्रकृती सुधारते आणि परिणामी पारव्यांच्या प्रजननाला याचा फायदा होऊन त्यांची संख्या वाढते. त्यामुेळे शहरात अनेक ठिकाणी पारव्यांचे अड्डे तयार झाले आहेत. 

ठाण्यानंतर पुणे महापालिकेला जाग

यापूर्वी ठाणेकरांना कबुतरांना दाणे टाकल्यास दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कबुतरांपासून सावधान असे बॅनर्सदेखील ठाण्यात लावण्यात आले होते. त्यानंतर ठाणे महापालिकेने कारावाईदेखील सुरु केली होती. ते पाहता आता पुणे महानगरपालिकेला जाग आली आहे. त्यांनी देखील आता दंड आकारण्याता निर्णय घेतला आहे. या सगळ्या कामाचा दर 15 दिवसांनी आढावा घेतला जाणार असल्याचं पालिकेने सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

अपुऱ्या कागदपत्रामुळं दस्त नोंदणी करण्यास नकार, रागातून थेट अधिकाऱ्यावरच हल्ला, पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना
अपुऱ्या कागदपत्रामुळं दस्त नोंदणी करण्यास नकार, रागातून थेट अधिकाऱ्यावरच हल्ला, पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना
संतापजनक! महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघांकडून लैंगिक अत्याचार, पुण्यात धक्कादायक घटना, चार आरोपींना अटक 
संतापजनक! महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघांकडून लैंगिक अत्याचार, पुण्यात धक्कादायक घटना, चार आरोपींना अटक 
Khalil Shaikh and Ravindra Dhangekar Case : खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget