एक्स्प्लोर

Pune Unseasonal Rain: पुण्यात जोरदार पाऊस, पिंपरी-चिंचवडलाही सरींनी झोडपलं, हवामान खात्याकडून राज्यात गारपिटीचा अंदाज

Pune Unseasonal Rain: पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

Pune Unseasonal Rain: राज्याच्या विविध भागात हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला असला, तरी शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Pune Unseasonal Rain: पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस

पुणे शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास बाणेर, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. बाणेर भागात पावसाचा जोर अधिक असल्याने सखल भागात पाणी साचले होते. पिंपरी-चिंचवड शहरातही पावसाने अर्धा तास अक्षरशः झोडपून काढले. सकाळपासून सूर्य आणि ढगांचा लपंडाव सुरू होता, मात्र दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची आणि पादचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. हवामान खात्याने पुढील दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, आजच्या पावसानंतर उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

Washim Unseasonal Rain: वाशिममध्ये पिकांचे नुकसान; शेतकरी चिंतेत

विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः रिसोड तालुक्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. अवेळी आलेल्या या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. या पावसामुळे बीजवाई कांदा, आंबा आणि फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापणीला आलेल्या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

Weather Update: हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 30 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस, ताशी 30 ते 50 किमी वेगाने जोरदार वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 1 एप्रिलपासून पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ashok Kharat Case Nashik Crime News: औषधाची बाटली, विविध खडे जप्त, पीडित महिलांचे लाईव्ह स्क्रिनिंग; अशोक खरातच्या केबिनमध्ये SIT ने काय काय केलं?

Ashok Kharat Case: मोठी बातमी : नीलम गोऱ्हेही अशोक खरातच्या भक्त, नाशिकच्या 5 स्टार हॉटेलमध्ये भेट, तृप्ती देसाईंच्या दाव्याने खळबळ

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget