Pune Rain Update: पुण्यात पावसाची संततधार सुरुच; पानशेत धरणात 100 टक्के पाणीसाठा
दोन दिवस पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातदेखील मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Pune Rain Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे (Pune) जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. कालपासून पुण्यात संसतधार आहे. संपुर्ण महाराष्ट्रात (maharashtra Rain) पावसाने जोरदार बॅटींग सुरु केली आहे. दोन दिवस पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातदेखील मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही(Pimpri-Chinchwad) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यासोबतच लोणावळ्यात (Lonavala) वरूनराजाने जोरदार हजेरी लावली आहे. नदी, नाले, धबधबे वाहू लागलेत, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. मात्र गेल्या 24 तासात दमदार पाऊस झाल्याने पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. धबधबे देखील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी लोणावळ्यात अधिक पाऊस पडला आहे.
खडकवासला (Khadakwasla Dam) धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी 12 दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण 1712 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावी, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
त्यासोबतच पुण्याजवळील सर्व धरणात चांगल्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरले असल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग करण्यात येणार आहे.भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदी पात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. मुळशी धरण जलाशय पातळीत देखील वाढ झाली आहे.
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ (vidarbha) आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
