Pune News Update : पुण्यातील आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रियांका अभिषेक उमरगेकर असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. प्रियंका ही पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेविका कमल घोलप यांची मुलगी होती.
नोव्हेंबर महिन्यात प्रियांकाचा विवाह अभिषेक यांच्यासोबत झाला होता. विवाहाच्या काही महिन्यातच प्रियांकाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रियांका आणि अभिषेक यांच्यात आज वाद झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. दोघांमध्ये वाद झाल्यांतर बेडरूमध्ये जाऊन आठ वाजण्याच्या सुमारास प्रियांकाने आत्महत्या केल्याचं समोर आलंय.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. पती-पत्नीमधील वादातून आत्महत्या केली, की आणखी दुसरे कारण होते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. परंतु, आत्महत्येचं कारण लवकरच समोर येईल असे पोलिसांचे मत आहे.
महत्वाच्या बातम्या