एक्स्प्लोर

Pune Crime News : निर्दयी पती! चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला ब्लेडचे तुकडे गिळायला लावले; पुण्यातील घटना

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला ब्लेडचे तुकडे कॅल्शियमच्या गोळ्यांमधून गिळायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 45 वर्षीय पतीनं पत्नीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे.

पुणे : पुण्यात कौटुंबिक हिंसाचारात वाढ होताना दिसत (Pune Crime News)आहे. रोज नवनव्या घटना समोर येत आहे. त्यातच चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला ब्लेडचे तुकडे कॅल्शियमच्या गोळ्यांमधून गिळायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 45 वर्षीय पतीनं पत्नीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. पुण्यातील उत्तमनगरमध्ये धक्कादायक प्रकार आला समोर आहे. सोमनाथ सपकाळ असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 41 वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिल्यानंतर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ऑक्टोबर पासून सुरू होता. गेल्या 2 महिन्यांपासून  या दाम्पत्यामध्ये अनेक वाद विवाद सुरू होते. सोमनाथ हा अनेक वेळा त्याच्या पत्नीवर  संशय घेत होता. यावरून त्यांच्यात वाद होऊन पती ने त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून मारहाण सुद्धा केली होती. काही दिवसांपूर्वी सोमनाथ याचा भाऊ आणि तो मिळून घरी दारू प्यायला बसले असतानासुद्धा यावरून वाद झाले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून सोमनाथने पत्नीची हत्या करण्याचे ठरवले होते

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोमनाथ ने त्याच्या पत्नीला कॅल्शीअमच्या कॅप्सुल दिल्या पण त्यात आधी ब्लेडचे तुकडे  टाकले आणि ते तिला खायला दिले. तसच त्याने तिला जबरदस्तीने ते गिळायला लावले. फिर्यादी यांच्या गळ्यात जखमा झाल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

कौटुंबिक हिंसाचारात वाढ...

मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. त्यात हत्या, वाद आणि कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाणत जास्त असल्याचं घडलेल्या घटनांमधून समोर आलं आहे. कधी चारित्र्याच्या संशयावरुन तर कधी मुल बाळ होत नसल्याने पत्नीचा छळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी मुलबाळ होत नसल्याने सुनेच्या पाळीचं रक्त विकल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर सासरच्यांना पोलिसांनी अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच  भोंदू बाबाच्या सांगण्यावरुन पत्नीला नग्न करुन सर्वांदेखत आंघोळ करायला लावल्याची घटना घडली होती. त्यावेळी देखील आरोपी असलेल्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरणं वाढत असून यावर आळा घालण्यात यावा, असा आवाज अनेकदा उठवला गेला आहे. मात्र तरीही समाजात या घटना घडतानाच दिसत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Mumbai : मुंबईत छठपूजेवरुन राजकारण तापलं, पालिकेने परवानगी नाकारली; पुन्हा एकदा काँग्रेस भाजपमध्ये वादाची ठिणगी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP MajhaRatnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special ReportSpecial Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Embed widget