Pune News LIVE Updates : सावरकरांना सोडवण्यासाठी गांधींनी प्रयत्न केले: शरद पोंक्षे

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 30 Oct 2021 07:49 PM
सावरकरांना सोडवण्यासाठी गांधींनी प्रयत्न केले: शरद पोंक्षे

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबाराव सावरकर अंदमानात असताना त्यांचे धाकटे बंधू नारायण सावरकर त्यावेळी इथे होते. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे होते. नारायण सावरकर यांनी गांधींना विचारलं दोन्ही बंधू अडकलेत त्यांना सोडवण्यासाठी तुम्ही काही करु शकता का? त्यावर गांधीजी म्हणाले, तुम्ही तुमच्या मार्गाने प्रयत्न करा, मी माझ्या मार्गाने करतो. गांधींनी सावरकरांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले, याचे पुरावेही आहेत. काँग्रेसवाल्यांना हे माहितीही नसेल की, सावरकांना सोडवायला गांधींनी प्रयत्न केलेत. अभ्यास नसल्याने काहीही बोलतात, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे. 


 

पुण्यात गेल्या 24 तासात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 112 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 59 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 112 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 494402 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 739 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 6200 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

बारामतीत आढळला 50 किलो भेसळयुक्त खवा.. अन्न औषध प्रशासनाची कारवाई

बारामती शहरात आज अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी धाडसत्र राबवण्यात आले होते.  त्यामध्ये शहरातील भिगवण रस्त्यावरील हिंद स्वीटस या मिठाईच्या दुकानामध्ये तब्बल 50 किलो भेसळयुक्त खवा आढळून आला आहे. पामोलीन तेल, दूध पावडर आणि रंग यापासून बनवलेला पदार्थ खवा म्हणून विकत होते. पेठा, बर्फी इत्यादी अन्न पदार्थ बनवून विक्री करत होते. त्यामुळे दुकान बंद केलं आहे. दिवाळीच्या तोंडावर अन्न  आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासनाने संबंधित खवा पुरवठादारही शोधला असून त्याच्यावरही कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, भेसळयुक्त खवा मिळून आल्यानंतर अन्न औषध प्रशासनाकडून हिंद स्वीटस हे मिठाईचे दुकान 15 दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

किरण गोसावीवर पुण्यातील आणखी दोन पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद

किरण गोसावीवर पुण्यातील आणखी दोन पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आली आहे. किरण गोसावीने फसवणूक केल्याची तक्रार घेऊन आणखी काही तरुण पुढे आल्यानंतर किरण गोसावीवर हे दोन गुन्हे नोंद करण्यात आलेत.  किरण गोसावीला त्याच्यावर 2018 मधे पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमधे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलीय.  आता आपलीही किरण गोसावीने अशीच फसवणूक केल्याची तक्रार घेऊन आणखी चार तरुण पुढे आल्यानंतर किरण गोसावीवर पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशन आणि वानवडी पोलीस स्टेशन अशा दोन पोलीस स्टेशनमधे गुन्हे नोंद करण्यात आलेत. 

पुण्यातील बस आणि कारच्या भाडे दरात 12 ते 15 टक्के वाढ

पुण्यातील बस आणि कारच्या भाडे दरात 12 ते 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. डिझेल आणि पेट्रोलचे वाढते दर,  टायर आणि वाहनांच्या स्पेअर्स स्पार्टच्या दरात झालेली दरवाढ यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याच पुणे कार एन्ड बस ओनर्स असोसिएशनने घेतलाय.  यामधे स्कूल बसचा देखील समावेश करण्यात आहे. आता स्कूल बसमधून तीन किलोमीटरच्या आतमधे असलेल्या शाळेत जाण्यासाठी प्रति विद्यार्थी सोळाशे रुपये मोजावे लागणार आहेत तर त्यानंतरच्या प्रत्येकी तीन किलोमीटरसाठी  प्रत्येकी तिनशे रुपये मोजावे लागणार आहेत .

पुणे-मुंबई लोहमार्गावरील लोणावळा हद्दीत ब्लॉक

पुणे-मुंबई लोहमार्गावरील लोणावळा हद्दीत आज ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळं पुणे-लोणावळा लोकलमध्ये बदल करण्यात आलाय. ही लोकल पुणे-तळेगाव स्टेशन दरम्यानच धावणार आहे. त्यात ही आज ही संख्या कमी करण्यात आलेली आहे. शिवाय डेक्कन एक्सप्रेस ही रेल्वे आज रद्द करण्यात आलीये. तांत्रिक दुरुस्तीसाठी लोहमार्ग प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

पार्श्वभूमी

Kiran Gosavi : वादग्रस्त पंच किरण गोसावीविरोधात पुण्यात आणखी गुन्हा दाखल


मुंबई ड्रग्ज केस प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याच्याविरोधात पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गोसावीवर भारतीय दंड संहितानुसार कलम 420, 465, 468 यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तीन जणांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्याचं पुणे पोलिसांनी माहिती दिली. सध्या फसवणूक प्रकरणी किरण गोसावी पोलिस कोठडीत आहे. पाच नोव्हेंबरपर्यंत किरण गोसावी याची पोलिस कोठडी आहे. पुणे पोलिसांनी किरण गोसावीला फसवणूक प्रकरणात पुण्यातील एका लॉजमध्ये पहाटे 3.30 वाजता ताब्यात घेतलं होतं. 


शिरूरमधील बँकेवर भरदिवसा पडलेल्या दरोड्यातील आरोपींना बेड्या, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त


भरदिवसा शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (Pune shirur bank robbery) येथील महाराष्ट्र बँकेवर पिस्तुलाचा धाक दाखवून पावणे तीन कोटी रुपयांच्या दरोड्यातील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.  स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींकडून 2 कोटी 19 लाखाचे सोने व 18 लाखाची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ, अंकुर महादेव पावळे , धोंडीबा महादु जाधव , आदिनाथ मच्छिंद्र पठारे , विकास सुरेश गुंजाळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 21 ऑक्टोबर रोजी दुपारी पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर दुपारी सव्वा एक वाजता सशस्त्र दरोडा पडला. 5 आरोपींनी कॅशियर, बँकेच्या कर्मचारी व ग्राहकांना हातातील पिस्तुलाचा धाक दाखवून कॅशियरला हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी बँकेतील 32 लाख 52 हजार 560 रोख रक्कम, 2 कोटी 47 लाख 20 हजार 390 रुपये किमतीचे 824 तोळे 130 मि.ग्रॅ. वजनाचे सोने असे एकूण 2 कोटी 79 लाख 72 हजार 950 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम दरोडा टाकून चोरुन नेले होते. या प्रकरणातील आरोपींच्या शोधार्थ 10 पथकं रवाना करण्यात आले होते अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी  पत्रकार परिषदेत दिली.



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.