Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 10 Nov 2021 09:57 AM
पुण्यात गेल्या 24 तासात 83 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 71 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 83 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 71 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 495082 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 711 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 5686 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर

अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याच नक्की झाला आहे.  या दौऱ्यात पुण्यातील वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेशन या संस्थेत अमित शहांकच्या उपस्थितीत सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आलय. या कार्यक्रमानंतर अमित शहा पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचीही शक्यता आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रमुख या नात्याने शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अमित शहांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याच आमंत्रण दिले आहे. केंद्र सरकारकडून सहकार मंत्रालय स्थापन करुन त्याची जबाबदारी अमित शहांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.  त्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या या पुणे दौऱ्याकडे सहकार क्षेत्राकडून उत्सुकतेनं बघितले जाणार आहे.

पार्श्वभूमी

किरण गोसावीला न्यायालयीन कोठडी



किरण गोसावीला पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हाबाबत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आज त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. मात्र लगेच पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी एका गुन्हाबाबत पोलीसांनी त्याला अटक दाखवून त्याचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर किरण गोसावीला उद्या लष्कर पोलीसांच्या ताब्यात दिले जाईल. 


खासदार अमोल कोल्हे रविवार पासून संपर्क क्षेत्राबाहेरच!



दिवाळी संपल्यापासून पुण्यातील राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे कोणाच्या ही संपर्कात नाहीत. रविवारी सायंकाळपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जातोय. संपर्काबाहेर जाण्यापूर्वी त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहीले होते,'आता सिंहावलोकनाची वेळ आलीये. गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली.  पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा करण्याची गरज त्यांनी या पोस्ट मधून व्यक्त केली. त्यासाठीच मी एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही. पुन्हा लवकरच भेटू... नव्या जोमाने, नव्या जोशाने. पण हे नमूद करताना फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतन शिबिरासाठी नाही.' त्यामुळं खासदार अमोल कोल्हेंच्या मनात नेमकं काय आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळासह जनमानसात सुरु झाली. दिवाळी संपली अन तेंव्हापासून आत्तापर्यंत अमोल कोल्हेंचा ना फोन लागतोय, ना त्यांच्या नातेवाईकांना किंवा तिन्ही स्वीय सहाय्यकांना ते कुठं आहेत, हे सांगता येतंय. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी असल्याचं मात्र सांगितलं जातंय. एरवी सोशल मीडियावर त्यांच्या संदर्भात पडणाऱ्या पोस्ट त्यांची सोशल मीडियाची टीम अथवा स्वीय सहाय्यकांकडून टाकल्या जायच्या. पण सिंहावलोकनाची वेळ आल्याची पोस्ट स्वतः खासदार कोल्हेंनी टाकल्याचं त्यांचे स्वीय सहाय्यक सांगतात. 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.