अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील क्राईम ब्रांचने एका अल्पवयीन सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे. या 12वी पास मुलाने आतापर्यंत 25,000 परदेशी नागरिकांची फसवणूक केल्याचं समोर झालं आहे. परदेशी नागरिकांची फसवणूक करुन त्याने आतापर्यंत सुमारे 50 कोटी रुपये मिळवले आहेत. या सायबर गुन्ह्यामध्ये त्याने कराचीमधील एका माणसाची मदत घेतली. त्याने आतापर्यंत सुमारे 40 देशांमधूल नागरिकांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या रिपोर्टनुसार, 21 वर्षीय तरुण हा नारायण नगरमध्ये राहणाऱ्या एका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराचा मुलगा असून त्याची आई महापालिकेच्या रुग्णालयात काम करते. आलिशान जीवनशैलीसाठी आणि सहज पैसे कमवण्यासाठी नारायणने 'डार्क वेब'चा वापर केला. त्याने इतरांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून 5 कोटी रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या आणि नंतर त्या रोख किंमतीला विकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणची ओळख कराचीमधील जिया मुस्तफा या व्यक्तीशी झाली. या व्यक्तीने नारायणला सायबर क्राईमचे धडे दिले. मुस्तफाने त्याला स्कॅमरच्या जीवनातील युक्त्या शिकवल्या आणि रशियन हॅकर्सकडे जाण्याचा सल्ला दिला. हे रशियन हॅकर्स वेबसाइट चालवतात जेथे जवळपास 50 देशांतील लोकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड तपशील विकले जातात. परमार यांने रशियन हॅकर्सकडून परदेशातील लोकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्डचे तपशील विकत घेतले आणि अमेरिकेपासून ते युगांडा पर्यंतच्या देशांतील लोकांची खाती रिकामी करण्यास सुरुवात केली.
नारायणला शिक्षणाची आवड नव्हती. त्यामुळे त्याने शिक्षण सोडले आणि सोशल मीडियावर सक्रिय झाला. त्यानंतर त्याला सर्फिंगद्वारे सायबर क्राईमची माहिती मिळाली. त्याचा सोशल मीडियावर सायबर गुन्हे करणारे आणि माहिती पुरवणाऱ्या लोकांशी ऑनलाईन ओळख झाली. त्यांनंतर त्याने परदेशातील लोकांची बँक खाती रिकामी करण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये, परमारला ‘डार्क सिक्रेट्स’ नावाच्या सोशल मीडिया ग्रुपशी संबंध आला. याग्रुपवर सक्रिय बँक खात्याचे तपशील मोठ्या प्रमाणात विकले जायचे. परमारने काही डीलमध्येही हात आजमावला आणि पहिल्या डीलमध्ये सुमारे 2,000 रुपये कमावले.
पोलिसांच्या प्राथमिकस तपासात समोर आले की, नारायण अर्ध्या मिनिटापेक्षा कमी वेळात एखाद्याचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड मिळवून काही मौल्यवान वस्तू किंवा दागिने खरेदी करतो, त्यानंतर तो रोखीने विकतो. त्याने सुमारे वर्षभरात 50 कोटी रुपयांच्या वस्तूंची खरेदी-विक्री केली. आश्रम रोडवरील एका दुकानात 30 रेफ्रिजरेटरची ऑर्डर दिल्यानंतर पोलिसांनी त्याला आणि इतर दोघांना पकडले तेव्हा या रॅकेटचा पर्दाफाश झाला.
त्याला अटक करून नंतर पुराव्यांअभावी जामिनावर सोडण्यात आले. त्याच्या सुटकेनंतरही, त्याने डार्क वेबवरून खरेदी करणे सुरु ठेवले आहे. डार्क वेब असे जाळे आह ज्याचा आयपी पत्ता (IP Address) शोधला जाऊ शकत नाही.
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की ते त्याच्याविरुद्ध कारवाई करु शकत नाहीत कारण त्याने त्याच्या रॅकेटचा डिजिटल पुरावेच नष्ट केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की तो आता सुमारे 10 तरुणांना सायबर गुन्ह्याचे धडे देत आहे. नारायण या तरुणांना सायबर फसवणूक करण्यात मार्गदर्शन करत आहे. तो आता रशियन हॅकर्सकडून डेबिट किंवा क्रेडिट कार्डबाबत माहिती विकत घेऊन इतर 10 तरुणांसह मिळून जगभरातील श्रीमंत लोकांची फसवणूक करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Miss universe 2021 : भारताची हरनाझ संधू विश्वसुंदरी होण्याच्या शर्यतीत
- Skin Care Tips : ब्लॅकहेड्सपासून सुटकेचा सोपा उपाय, 'हे' करुन पाहा...
- महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले ; विनय कोरे यांची कबुली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha