'आईला सांगितलंस तर विहिरीत ढकलून देईन' अशी धमकी देत नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमरावतीत समोर आली आहे. 'आईला सांगितलंस तर विहिरीत ढकलून देईन' अशी धमकी देत नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे
अमरावती : वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमरावतीत (Father Raped Daughter in Amravati) समोर आली आहे. 'आईला सांगितलंस तर विहिरीत ढकलून देईन' अशी धमकी देत नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडला प्रकार घडला असून नराधम बापाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.
काळिमा लावणारी ही घटना 9 डिसेंबरला नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्गवरील असलेल्या एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका 35 वर्षीय नराधम आरोपी वडिलाने त्याच्याच 8 वर्षीय चिमुकलीला धमकी देऊन जबरदस्तीने अत्याचार केला. त्या दिवशी तिची आई कामाला गेली होती घरात कोणी नसल्याची त्याने संधी साधून तिच्यावर अत्याचार केला. आपल्याच मुलीवर अत्याचार केल्यानंतर 'मम्मी को बतायेंगी तो, कुये में डाल दूंगा' अशी तिला धमकी सुद्धा दिली.
या किळसवाण्या घटनेनंतर तिच्या आईजवळ पीडित चिमुकलीने सर्व प्रकार सांगितला. हे कळताच तिच्या आईने नराधम पतीविरुद्ध नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी रात्री गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. आरोपी नराधम हा दारूच्या आहारी गेला होता अशी माहिती समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या