FDA Action: पुण्यात अन्न, औषध प्रशासनाचा कारवाईचा धडाका सुरुच; 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने (Food and Drugs) पुणे जिल्ह्यात सुमारे 50 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
FDA Action: अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने (Food and Drugs) पुणे (PUNE NEWS)जिल्ह्यात सुमारे 50 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. मे. नटराज पान दुकान, मे. भगवानबाबा पान दुकान, मे. प्रिया पान स्टॉल, चिंचवड स्टेशन आणि चिंचवड या चार ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे 41 हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या चार जणांविरुद्ध संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन चौघांना अटक करण्यात आली आहे.
गार्णीश पान दुकान, त्रिमूर्ती चौक, धनकवडी आणि मे. न्यु जयनाथ पान दुकान, आंबेगाव, पुणे या दोन ठिकाणी धाड टाकून प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे 9 हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. या दोन जणांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने (पुणे विभागात मोठी कारवाई केली होती. सुमारे 30 लाख 37 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती. पुणे कार्यालयाने वारजे माळवाडी परिसरातील मे. मुकेश सुपर मार्केट येथे विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला, व्ही. एन सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित पदार्थाचा सुमारे 1 लाख 20 हजार 129 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला होता. मालक मुकेश कुमार अग्रवाल यांच्याविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी पुन्हा प्रतिबंधित पदार्थाची विक्री रोखण्यासाठी सगळा माल जप्त करण्यात आला आहे.दुकानाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन
पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा तडाखा लावला आहे. ऐन दिवाळीत त्यांनी अनेक ठिकाणांवर कारवाई केली होती.