एक्स्प्लोर

पारव्यांना प्रेमापोटी खाऊ घालू नका, पुणे पालिकेच्या सूचना

मंदिरं आणि चौकांमधील मोकळ्या जागांमध्ये लोक भरभरुन धान्य टाकत असतात आणि ते खाण्यासाठी पारव्यांचे थवेच्या थवे जमा होतात

पुणे : पारव्यांना खायला घातल्यामुळे पुण्य मिळतं असा अनेकांचा समज आहे. मात्र या पारव्यांमुळेच श्वसनाचे अनेक आजार बळावत असल्याचं समोर आलं आहे. पक्ष्यांना उघड्यावर खायला घालू नये अशा सूचना पुणे महापालिकेने याआधीच दिल्या आहेत. मात्र या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्याबद्दलचा कायदाच करण्यात यावा अशी मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली. पुण्यातील अनेक भागांमध्ये नागरिका पारवे-कबुतरांना सकाळच्या वेळी खायला घालत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. मंदिरं आणि चौकांमधील मोकळ्या जागांमध्ये लोक भरभरुन धान्य टाकत असतात आणि ते खाण्यासाठी पारव्यांचे थवेच्या थवे जमा होतात. या पारव्यांना खायला घालून आपण अनेक आजारांना आमंत्रण देत आहोत, हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही खायला घालणाऱ्या या लोकांना ते मान्य होत नाही. या पक्ष्यांना खायला घातल्यामुळे पुण्य मिळत असल्याच्या समजुतीतून डॉक्टरांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याकडेही दुर्लक्ष केलं जातं. पोटभर खाऊन झालं की हे पारवे शहरातील इमारतींचा आसरा घेतात. कुणाच्या गॅलरीमध्ये तर कुणाच्या गच्चीवर त्यांचा वावर असतो. अनेकदा तर हे पारवे घरातही प्रवेश करतात. या पारव्यांची पिसं आणि विष्ठेमधून अनेक आजार बळावत असल्याचं समोर आल्यानंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याबाबदल कडक उपाययोजना करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. हायपर सेन्सेटिव्ह न्यूमोनिया, दमा असे फुफ्फुसांशी संबंधित आजार होण्यास हे पारवे कारणीभूत ठरत आहेत. रुग्णाचं फुफ्फुस आकुंचन पावणं, बोलताना दम लागणं अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं आणि कित्येकदा तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. खरं तर उद्यानं आणि मोकळ्या जागांमध्ये पक्षांना खायला टाकू नये, याबद्दल महापालिकेने आधीच ठिकठिकाणी सूचना केलेल्या आहेत. अनेक ठिकाणी तसे बोर्डही लावलेले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन पक्ष्यांना भरभरुन खायला दिलं जात असल्यामुळे महापालिकेच्या उप विधी समितीमध्ये त्याबाबत कायदाच करण्यात यावा, अशी मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली. या पारव्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सर्व राजकीय पक्षांचं एकमत आहे.  मात्र नवा कायदा करण्यापेक्षा आहे त्या नियमांचीच योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हायला व्हावी असं सत्ताधारी भाजपला वाटतं. एकीकडे पुण्या-मुंबईसारख्या शहरांमधे कावळे आणि चिमण्या दिसणं दुर्मिळ झालं आहे, तर दुसरीकडे फुकटचं खायला आणि इमारतींमध्ये आयता आसरा मिळत असल्यामुळे या पारव्यांची संख्या वेगानी वाढली आहे. आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या या पारव्यांना आवर घालण्यासाठी जशी कायद्याची गरज आहे तशीच पाप-पुण्याबद्दलच्या संकल्पना तपासून घेण्याचीही आवश्यकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Sunetra Pawar On Chakan MIDC Pune: चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Rohit Pawar Pune: चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्यांना उद्योग मंत्र्यांकडून धमकीचे फोन; उद्योजकांच्या भेटीसाठी गेलेल्या रोहित पवारांचा मोठा आरोप
चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्यांना उद्योग मंत्र्यांकडून धमकीचे फोन; उद्योजकांच्या भेटीसाठी गेलेल्या रोहित पवारांचा मोठा आरोप

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget