एक्स्प्लोर

महिंद्रा पुण्यात उभारणार 10 हजार कोटींचा प्लांट, लॉन्च करणार 5 इलेक्ट्रिक कार

Mahindra New EV plant in Pune: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. महिंद्रा पुण्यात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

Mahindra New EV plant in Pune: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. महिंद्रा पुण्यात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याला महाराष्ट्र शासनाकडून औद्योगिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मान्यताही मिळाली आहे. महिंद्रा पुण्यात (Pune) इलेक्ट्रिक वाहन उत्पादक प्लांट उभारणार आहे. या प्लांटच्या निर्मितीसाठी 7 ते 8 वर्षांचा कालावधी लागू शकतो. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे.

कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये आगामी बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन अंतर्गत BE इलेक्ट्रिक SUV चे अनावरण केले आहे. जे कंपनीच्या INGLO प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. ऑल-न्यू एसयूव्हींपैकी पहिली 2024 पर्यंत येण्याची अपेक्षा आहे. महिंद्राच्या बॉर्न इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये पाच मॉडेल्स असतील. यामध्ये XUV.E8, XUV.E9, BE.05, BE.07 आणि BE.09 यांचा समावेश आहे. ज्यामध्ये XUV.E8 आणि XUV.E9 आधी लॉन्च होतील.

महिंद्राच्या आगामी एसयूव्हीचे मुख्य डिझायनर प्रताप बोस यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सफर्डशायर, युनायटेड किंगडम येथील महिंद्रा अॅडव्हान्स्ड डिझाइन युरोप (MADE) सुविधेमध्ये एसयूव्हीची डिझाइन तयार करण्यात आली आहे. यावर बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा ऑटो आणि फार्म सेक्टर कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर म्हणाले की, “पुण्यात (Pune) गुंतवणूक करण्यासाठी आणि आमच्या ईव्ही उत्पादन प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या मंजुरीमुळे आम्हाला आनंद झाला आहे. महाराष्ट्र 70 हुन अधिक वर्षांपासून आमचे गृहराज्य आहे. महिंद्राच्या गुंतवणुकीसोबतच सरकार व्यवसाय सुलभता आणि प्रगतीशील धोरणांकडे लक्ष देत आहे. यामुळे महाराष्ट्राला भारताचे ईव्ही हब बनण्यास मदत होईल, ज्यामुळे पुढील भारतीय आणि परदेशी गुंतवणुकीला थेट प्रोत्साहन मिळेल.

दरम्यान, कंपनीच्या कॉन्सेप्ट मॉडेल XUV.e8 मध्ये एक लोखंडी ग्रील, बंपर माउंट केलेले हेडलॅम्प, बम्परकडे जाणारा पूर्ण रुंदीचा LED लाइट बार, एक शार्प डिझाइन केलेला हुड आणि Angular Stance आहे. XUV.e8 ची लांबी 4740mm, रुंदी 1900mm आणि उंची 1760mm आहे, व्हीलबेस 2762mm आहे. XUV700 च्या तुलनेत इलेक्ट्रिक SUV सुमारे 45mm लांब, 10mm रुंद आणि 5mm उंच आहे. ही कार 80kWh बॅटरी पॅक आणि AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) प्रणालीसह उपलब्ध केले जाईल.

इतर बातम्या: 

Viral Video: 'न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन', 21 वर्षीय मुलाने केलं 52 वर्षाच्या महिलेशी लग्न, पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget