एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune Loksabha Election : रवींद्र धंगेकर यांच्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल; कारण ठरलं...

लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. आता त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरदेखील आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पुणे : पुणे लोकसभेच्या निवडणुकीचं (Pune Loksabha Election 2024) मतदान (Pune Crime News) पार पडलं आहे. याच मतदानाच्या दरम्यान भाजप आणि क़ॉंग्रेसकडून आंदोलनं करण्यात आली. त्यात दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. आता त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरदेखील आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

रवींद्र धंगेकर यांच्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप यांच्यासह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात  आले आहेत. आचारसंहिता असतानाही बेकायदेशीर जमाव जमून घोषणाबाजी करुन उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. 

पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी रवींद्र धंगेकर यांनी भाजप पैसे वाटप करत असल्याच्या आरोपाखाली सहकार नगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते.यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ही धगेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. ही घोषणाबाजी करणं भाजपच्या कार्यकर्त्यांना चांंगलंच भोवलं आहे. 

धंगेकरांवरही गुन्हा दाखल 

पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव गोळा केल्या प्रकरणी धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. भाजपावरती पैसे वाटप केल्याचा आरोप करत धंगेकर यांनी मतदानाच्या आदल्या दिशवी ठिया आंदोलन केलेलं होतं. ते आंदोलन करणं धंगेकरांना चांगलंच महागात पडलं आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात धंगेकरांसह 35 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची नावे सांगूनही त्यांच्यावर कसलीही कारवाई पोलीस करत नसल्याने सहकारनगर पोलीस ठाण्यातच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रविवारी ठिय्या आंदोलन केलं होतं.

पुण्यात रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ तगडी लढत

पुण्यात रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ तगडी लढत आहे. दोघांचंही भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. पुण्यात एकूण 53.54 टक्के मतदान झालं आहे. 11 लाख 3 हजार 678 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Fodder Shortage: राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध

मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget