एक्स्प्लोर
पुण्यात ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दोन विद्यार्थिनी गंभीर
ट्रकचालकाचं नियंत्रण सुटून पुण्यात झालेल्या अपघातात एका महिलेला जीव गमवावा लागला आहे.

पुणे : पुण्यात भरधाव ट्रकच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन शाळकरी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. चांदणी चौकातून कोथरुडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. आरोपी ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने पूजा चव्हाण या महिलेसह दोन विद्यार्थिनींना धडक दिली. यामध्ये महिलेला जागीच प्राण गमवावे लागले, तर निकीता नवले आणि शितल राठोड या विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या रस्त्यावर तीव्र उतार असल्यामुळे नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असल्याची माहिती आहे. ट्रकने तिघींसह काही गाड्यांनाही धडक दिली. त्यामध्ये गाड्यांचंही नुकसान झालं.
आणखी वाचा























