एक्स्प्लोर

पुण्यात माजी नगरसेवक पुत्राचं दारुच्या नशेत हार्श ड्रायव्हिंग; हॅरियर कारने दोघांना उडवलं, गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने दारू पिऊन अपघात केलाय.

पुणे : शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघाताच्या (Accident) घटनेनंतर पुण्यातील (Pune) पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून कारवाईला वेग आला आहे. पुण्यात दारु पिऊन गाडी चालवल्यास परवाना रद्द करण्यात येणार असल्याचंही पुणे पोलिसांनी यापूर्वीच सांगितलं आहे. मात्र, अद्यापही बड्य बापांची लेकरं दारु पिऊन गाडी चालवून इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी पोर्शे कार अपघात, त्यानंतर अपघातांची मालिकाच लागल्यांचं दिसून आलं. मुंबईतील वरळीतही हीट अँड रन प्रकरण चांगलंच गाजलं. आता, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माजी नगरसेवकाच्या लेकानं दारु पिऊन टेम्पोला धडक दिली. त्यामध्ये, टेम्पोचालक आणि गाडीचा क्लीनर जखमी झाला आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने दारू पिऊन अपघात केलाय. ड्रंक एन्ड ड्राईव्हच्या या घटनेत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सौरभ गायकवाड हा देखील जखमी झालाय. पुण्यातील मांजरी-मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर येथे मंगळवारी 16 जुलै रोजी पहाटे हा अपघात घडलाय. सौरभ गायकवाड हा त्याची MH 12 TH 0505 क्रमांकाची हॅरीयर कार घेऊन पहाटे पाच वाजता मुंढव्यातील घरी निघाला होता. त्यावेळी तो दारुच्या नशेत होता. त्यामुळे समोरुन येणाऱ्या पोल्ट्री फार्मच्या टेम्पोला त्याने धडक दिली. त्यावेळी, तिथे जमलेल्या लोकांनी चालक व क्लीनर राजा शेख याला वरद लाइफ हॉस्पिटल येथे घेऊन उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी, चालकाच्या कपाळावर जखम झाली असून खांद्याला मुका मार लागला होता. तर क्लीनर राजा शेख याला उजव्या चेहऱ्यावर खर्चटलेले असून उजव्या पायाच्या नडगीला जखम झाली होती, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, याप्रकरणी सौरभ गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ गायकवाडचे वडील बंडू गायकवाड हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत आहेत.

पुण्यतील गुन्हेगारी घटनांवरुन नेतेमंडळींचा संताप

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून पुणे शहरातील अपघात, ड्रग्ज प्रकरण, वाहतूक कोंडी आणि वाढती गुन्हेगारी चांगलीच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्याच्या वाढत्या गुन्हेगारीवर आणि बदलत्या परिस्थितीवर भाष्य करताना, पुणे ही क्राइम कॅपिटल बनत असल्याचं म्हटलं होतं. तर, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनीही ड्रग्ज प्रकरणावरुन आक्रमक भूमिका घेत थेट राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पुणे पोलिस आयुक्तांवर हफ्तेखोरी व भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. 

हेही वाचा

Ajit Pawar: बालेकिल्ल्यात धक्का बसल्यानंतर अजित पवार अॅक्शन मोडमध्ये! तातडीने बोलावली बैठक, काय असणार पुढची रणनीती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू उपचारासाठी पुण्यात दाखल, तब्बल 11 वर्षांनी तुरुंगातून बाहेर
बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू उपचारासाठी पुण्यात दाखल, तब्बल 11 वर्षांनी तुरुंगातून बाहेर
Exclusive : मंत्र्यांचे बंगले, उधळपट्टीचे इमले! मंत्र्यांच्या बंगल्यांसह कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींचा खर्च, ABP Majha कडून पर्दाफाश 
Exclusive : मंत्र्यांचे बंगले, उधळपट्टीचे इमले! मंत्र्यांच्या बंगल्यांसह कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींचा खर्च, ABP Majha कडून पर्दाफाश 
MVA : विजय वडेट्टीवारासंह जयंत पाटील, आदित्य ठाकरे मालवणमध्ये, मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे नाना पटोलेंची तातडीची बैठक, मविआ रणनीती ठरवणार
महाराष्ट्रातील घडामोडींवर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंची तातडीची बैठक, मविआ रणनीती ठरवणार
Bigg Boss Marathi Season 5 : राड्यानंतर घरातील सदस्यांनी अरबाज-निक्कीची घेतली फिरकी, घरात नवीन समीकरण तयार होणार?
राड्यानंतर घरातील सदस्यांनी अरबाज-निक्कीची घेतली फिरकी, घरात नवीन समीकरण तयार होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News : नऊ सेकंदांत बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 28 August 2024MVA Meeting at Matoshree : महाविकास आघाडीचीआज 'मातोश्री' निवासस्थानी तातडीची बैठकMaharashtra Vidhansabha : Nitin Gadkari यांनी विधानसभेला प्रचार आणि नियोजनात सक्रिय राहावं :RSSSamruddhi Mahamarg EXCLUSIVE : समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा, MSRDCकडून तात्पुरती मलमपट्टी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू उपचारासाठी पुण्यात दाखल, तब्बल 11 वर्षांनी तुरुंगातून बाहेर
बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू उपचारासाठी पुण्यात दाखल, तब्बल 11 वर्षांनी तुरुंगातून बाहेर
Exclusive : मंत्र्यांचे बंगले, उधळपट्टीचे इमले! मंत्र्यांच्या बंगल्यांसह कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींचा खर्च, ABP Majha कडून पर्दाफाश 
Exclusive : मंत्र्यांचे बंगले, उधळपट्टीचे इमले! मंत्र्यांच्या बंगल्यांसह कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींचा खर्च, ABP Majha कडून पर्दाफाश 
MVA : विजय वडेट्टीवारासंह जयंत पाटील, आदित्य ठाकरे मालवणमध्ये, मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे नाना पटोलेंची तातडीची बैठक, मविआ रणनीती ठरवणार
महाराष्ट्रातील घडामोडींवर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंची तातडीची बैठक, मविआ रणनीती ठरवणार
Bigg Boss Marathi Season 5 : राड्यानंतर घरातील सदस्यांनी अरबाज-निक्कीची घेतली फिरकी, घरात नवीन समीकरण तयार होणार?
राड्यानंतर घरातील सदस्यांनी अरबाज-निक्कीची घेतली फिरकी, घरात नवीन समीकरण तयार होणार?
Sunil Kedar : नागपूर बँक घोटाळा प्रकरण, सुनील केदार मंत्री वळसे पाटलांसमोर मांडणार तोंडी स्वरुपात म्हणणं, नागपूर खंडपीठाची मंजुरी 
Sunil Kedar : नागपूर बँक घोटाळा प्रकरण, सुनील केदार मंत्री वळसे पाटलांसमोर मांडणार तोंडी स्वरुपात म्हणणं, नागपूर खंडपीठाची मंजुरी 
Kirit Somaiya: भाजपचे माजी नेते सुरेश कुटेचा घोटाळा, ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदाराला किरीट सोमय्या म्हणाले, तुमची एक दमडीही मिळणार नाही...
भाजपचे माजी नेते सुरेश कुटेचा घोटाळा, ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदाराला किरीट सोमय्या म्हणाले, तुमची एक दमडीही मिळणार नाही...
Bollywood Films Released Again :  तुंबाड ते गँग्स ऑफ वासेपूर... पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार ब्लॉकबस्टर चित्रपट
तुंबाड ते गँग्स ऑफ वासेपूर... पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार ब्लॉकबस्टर चित्रपट
Bhiwandi Crime : पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत
पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत
Embed widget