एक्स्प्लोर

Chandrakant patil : 'हू इज धंगेकर?' विचारणारे चंद्रकांत पाटील आता म्हणतात...

मागील काही दिवस प्रचारादरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील 'हू ईज धंगेकर?' हा प्रश्न विचारत डिवचलं होतं. मात्र ते आमच्यापुढे टिकणार नाहीत असं म्हणणारे चंद्रकांत पाटील यांनी आता हू ईज धंगेकर? यावर विचारल्यावर मौन पाळलं आहे.

Chandrakant Patil : मागील काही दिवस प्रचारादरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील 'हू इज धंगेकर?' हा प्रश्न विचारत डिवचलं होतं. मात्र ते आमच्यापुढे टिकणार नाहीत असं म्हणणारे चंद्रकांत पाटील यांनी आता हू इज धंगेकर? यावर विचारल्यावर मौन पाळलं आहे. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे निवडून आले. त्यानंतर सगळीकडे 'हू इज धंगेकर?, धंगेकर नाऊ एमएलए' अशा घोषणा देऊन धंगेकरांच्या समर्थकांनी चंद्रकांत पाटलांना चांगलंच डिवचलं आणि तसे पोस्टर्सही पुण्यात लावण्यात आले. 

चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांचं अभिनंदन करण्यासाठी चंद्रकांत पाटील गेले होते. त्यावेळी त्यांनी धंगेकरांच्या मुद्द्यावर बोलणं टाळलं. चंद्रकांत पाटलांनी अश्विनी जगताप यांचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आमदार म्हणून त्या लवकरच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खासदार संजय राऊतांनी निवडणूक आयोगाबद्दल अपशब्द वापरत केलेल्या शिवीगाळच्या वक्तव्यावर बोलणं त्यांनी टाळलं.

चंद्रकांत पाटलांनी धंगेकरांना डिवचलं होतं...

भाजपने कसबा पोटनिवडणुकीत धंगेकरांना पराभूत करण्यासाठी चांगलीच फौज मैदानात उतरवली होती. रोड शो, प्रचारसभा, कोपरा सभा घेतल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मैदानात उतरले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी प्रचार सभेत रवींद्र धंगेकरांना चांगलंच डिवचलं होतं. भरसभेत हू इज धंगेकर तो आमच्यासमोर टिकू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर धंगेकरांचे समर्थक पेटून उटले होते त्यांनी सगळ्या कसब्यात पुणेरी पाट्या लावल्या होत्या. विजयानंतर त्यांनी ही कविता व्हायरल करुन चंद्रकात पाटलांना चांंगलंच उत्तर दिलं. धंगेकर नाऊ.. MLA असं आता सगळीकडे व्हायरल केलं. कसबा हा मागील 28 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. खासदार गिरीश बापट यांच्यानंतर मुक्ता टिळकांनी कसब्याचा विकास केला. त्यानंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात कॉंग्रेसने मुसंडी मारली आहे. ही निवडणूक भाजपने मोठी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांचा हा विजय भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. 

धंगेकर फीवर कोल्हापुरात..

कसब्याची पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी जिंकल्यानंतर कोल्हापुरात देखील होर्डिंग लावण्यात आले. मात्र या होर्डिंगवर 'धीस इज धंगेकर' म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यावर महाविकास आघाडीने टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांचा प्रचारात सर्वसामान्य घरातील धंगेकर यांना अपमानास्पद उल्लेख केला होता आणि म्हणूनच हे होर्डिंग लावल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajabhau Munde : बीडमध्ये अजितदादांचा पंकजाताईंना दे धक्का, कट्टर समर्थक मुंडे पिता-पुत्र घड्याळ हाती घेणार
बीडमध्ये अजितदादांचा पंकजाताईंना दे धक्का, कट्टर समर्थक मुंडे पिता-पुत्र घड्याळ हाती घेणार
दादा भुसेंनी पाठ फिरवताच मारहाण; शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भिडले, सर्किट हाऊसमध्ये राडा
दादा भुसेंनी पाठ फिरवताच मारहाण; शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भिडले, सर्किट हाऊसमध्ये राडा
सेवानिृवत्त शिक्षिकेच्या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ; CCTV ची डीव्हीआरही गायब, पोलीस पोहोचले
सेवानिृवत्त शिक्षिकेच्या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ; CCTV ची डीव्हीआरही गायब, पोलीस पोहोचले
जम्मूमधील उधमपूरमध्ये सीआरपीएफ जवानांचे प्रवासी वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 3 जवानांचा मृत्यू, 5 गंभीर
जम्मूमधील उधमपूरमध्ये सीआरपीएफ जवानांचे प्रवासी वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 3 जवानांचा मृत्यू, 5 गंभीर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajabhau Munde : बीडमध्ये अजितदादांचा पंकजाताईंना दे धक्का, कट्टर समर्थक मुंडे पिता-पुत्र घड्याळ हाती घेणार
बीडमध्ये अजितदादांचा पंकजाताईंना दे धक्का, कट्टर समर्थक मुंडे पिता-पुत्र घड्याळ हाती घेणार
दादा भुसेंनी पाठ फिरवताच मारहाण; शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भिडले, सर्किट हाऊसमध्ये राडा
दादा भुसेंनी पाठ फिरवताच मारहाण; शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भिडले, सर्किट हाऊसमध्ये राडा
सेवानिृवत्त शिक्षिकेच्या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ; CCTV ची डीव्हीआरही गायब, पोलीस पोहोचले
सेवानिृवत्त शिक्षिकेच्या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ; CCTV ची डीव्हीआरही गायब, पोलीस पोहोचले
जम्मूमधील उधमपूरमध्ये सीआरपीएफ जवानांचे प्रवासी वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 3 जवानांचा मृत्यू, 5 गंभीर
जम्मूमधील उधमपूरमध्ये सीआरपीएफ जवानांचे प्रवासी वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 3 जवानांचा मृत्यू, 5 गंभीर
Solapur News : आम्हाला पंचनामा, नुकसानभरपाई नको, हमीभाव द्या; शेतात साचलेल्या पाण्यात बसून सोलापूरच्या युवा शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांना आर्त हाक
आम्हाला पंचनामा, नुकसानभरपाई नको, हमीभाव द्या; शेतात साचलेल्या पाण्यात बसून सोलापूरच्या युवा शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांना आर्त हाक
दिल्लीत शेतकऱ्यांच्या मार्गात खिळं ठोकणाऱ्या, भिंती उभ्या करणाऱ्या मोदींना आताच आठवण का आली? देशात अघोषित सीएए-एनआरसी लागू झालं आहे का? यांचा बुरखा दिवसागणिक फाटू लागला; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
दिल्लीत शेतकऱ्यांच्या मार्गात खिळं ठोकणाऱ्या, भिंती उभ्या करणाऱ्या मोदींना आताच आठवण का आली? देशात अघोषित सीएए-एनआरसी लागू झालं आहे का? यांचा बुरखा दिवसागणिक फाटू लागला; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray on Raj Thackeray: इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत, राज यांच्या प्रश्नावर अवघ्या एकाच वाक्यात उत्तर!
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत, राज यांच्या प्रश्नावर अवघ्या एकाच वाक्यात उत्तर!
Video : अरे भाऊ, जागा द्या ना! बाइकस्वाराची ओव्हरटेकसाठी धडपड अन् झाला भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
अरे भाऊ, जागा द्या ना! बाइकस्वाराची ओव्हरटेकसाठी धडपड अन् झाला भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Embed widget