VIDEO : कुत्र्याला वाचवायला गेलो अन् घसरलो, पाच दिवस अन्न-पाण्याविना भटकलो; सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडची स्टोरी समोर
Missing Gautam Gaikwad Story : सिंहगडवर फिरायला गेलेला गौतम गायकवाड हा तरुण पाच दिवसांपासून बेपत्ता होता. या चार दिवसात त्याला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागले आहे याची माहिती त्याने दिली.

पुणे : हैद्राबादहून मित्रांसह पुण्यात फिरायला आलेला 24 वर्षांचा गौतम गायकवाड तब्बल पाच दिवसांपासून बेपत्ता होता. मात्र अखेर तो सिंहगडावरून जिवंत अवस्थेत पोलिसांना सापडला. गौतम गायकवाड सिंहगडावर फिरत असताना एका कुत्र्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याचदरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो दरीत खाली पडला. या अपघातानंतर तो काही काळ बेशुद्ध अवस्थेत होता.
गौतमच्या बेपत्ता होण्यामुळे त्याचे मित्र आणि कुटुंबीय चिंतेत होते. पाच दिवस तो कुठे होता, काय घडलं, याची संपूर्ण कहाणी गौतमने एबीपी माझाला सांगितली.
Missing Gautam Gaikwad VIDEO : गौतम गायकवाडने काय सांगितलं?
मित्रांसोबत सिंहगडला फिरायला आलो होतो. त्यावेळी लघवीसाठी बाजूला गेल्यानंतर एका ठिकाणी कुत्रा अडकल्याचं पाहिलं. त्या कुत्र्यापर्यंत माझा हात जात होता. त्यावेळी त्याला वाचवायला गेलो आणि माझा पाय निसटला. त्यानंतर मी वरती यायचा प्रयत्न केलो पण कडा असल्याने वरती जाता येत नव्हतं. मी ओरडण्याचा प्रयत्न केला. पूर्ण अंधार झाल्यानंतर मला भीती वाटू लागली होती. त्यावेळी सतत पाऊस पडत होता. त्यामुळे कुणाचाही आवाज येत नव्हता.
एका ठिकाणी जरा जागा मिळाली आणि त्या ठिकाणी बसलो. बसल्या ठिकाणीच मला झोप लागली. ज्यावेळी जाग आली त्यावेळीही मला समोर काहीही दिसत नव्हतं.
आडव्या बाजूने पुढे जायला येत होतं, पण वरती जायला येत नव्हतं. पाच दिवस मला काहीच खायला मिळालं नाही, पाणीही मिळालं नाही. जसं जसं पुढे जायला मिळत होतं तसं मी पुढे जात होतो. पाच दिवसांनी मला समोर लांब काही माणसं दिसली, पण माझा आवाज त्यांना जात नव्हता. पुढे चालत चालत गेलो आणि नंतर दोन लोक माझ्या समोर आली.
सध्या प्रकृती स्थिर
गौतम गायकवाड जवळपास पाच दिवस दरीत अडकून होता. त्या काळात त्याला ना अन्न मिळालं, ना पाणी. त्याने अनेकदा मदतीसाठी आवाज दिला, मात्र त्याचा आवाज कोणीच ऐकू शकला नाही. त्यामुळे तो पूर्णपणे एकटा आणि असहाय्य अवस्थेत होता. हळूहळू शुद्धीवर आल्यानंतर त्याने कसाबसा मार्ग काढत वर चढायला सुरुवात केली आणि पाच दिवसांनी पुन्हा सिंहगडावर परतला. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपपाच सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
ही बातमी वाचा:

























