एक्स्प्लोर

Pune gangster Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू, कोथरुडमध्ये घडला थरार

Pune Latest Marathi News Update : पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरुड परिसरात गोळीबार करण्यात आलाय.

Pune Latest Marathi News Update : पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad mohol) याच्यावर पुण्यातील कोथरुड (pune kothrud) परिसरात गोळीबार करण्यात आलाय. शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  गुंड शरद मोहोळ याच्यावर झालेला हा जीवघेणा कुणा केला ? हा हल्ला एखाद्या टोळीने अथवा पूर्ववैमन्यस्यातून झाला का? याची अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहे. 

Maharashtra Pune Kothrud Crime News : भरदुपारी गोळीबार 

शुक्रवारी भरदुपारी कोथरुडमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली. 

Pune Kothrud Crime News : कोथरुडमध्ये भीतीचं वातावरण 

कोथरुडमधील सुतारदरा या ठिकाणी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरु केली आहे. पूर्ववैमन्यास्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गोळीबार झाल्यानंतर कोथरुड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेय.

Pune Gangster Sharad Mohol : अट्टल गुन्हेगार, अनेक गुन्हे -

शरद मोहोळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला होता. पण दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केल्याप्रकरणात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्यावर अनेक गुन्ह्याची नोंद आहे. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळ याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते. 

आणखी वाचा :

Pune Gangster Sharad Mohol : पुण्यातील गुंड शरद मोहोळवर गोळीबार : ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
Mumbai Crime: गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
Kartiki Ekadashi 2024: सोहळा कार्तिकीचा, गजर हरीनामाचा! कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंजवार यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा
पंढरीत रंगला, सोहळा कार्तिकीचा; पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
Horoscope Today 12 November 2024 : आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 Headlines | सकाळी 6 च्या शंभर हेडलाईन्स | 6 AM 12 November 2024 | ABP MajhaCM Eknath Shinde : साकीनाक्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला, संतोष कटके नावाच्या व्यक्तीने अडवला ताफाABP Majha Headlines | 6.30 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 12 NOV 2024 TOP Headlines

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
Mumbai Crime: गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
Kartiki Ekadashi 2024: सोहळा कार्तिकीचा, गजर हरीनामाचा! कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंजवार यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा
पंढरीत रंगला, सोहळा कार्तिकीचा; पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
Horoscope Today 12 November 2024 : आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
Horoscope Today 12 November 2024 : आज कार्तिकी एकादशीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज कार्तिकी एकादशीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
विधानसभेची खडाजंगी: राखीव केज मतदारसंघात मुंदडांना पुन्हा संधी मिळणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? यंदा कोणाची बाजी
Embed widget