एक्स्प्लोर
पुण्यातील उच्चभ्रू घरातल्या 4 विद्यार्थ्यांची बाईकचोरी
महागडे डिजिटल कॅमेरे, हायटेक सायकल आणि टू व्हीलर्स... पुण्याच्या फरासखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं हा लाखांचो ऐवज जप्त केला आहे.

पुणे : पुण्यात उच्चभ्रू घरातल्या मुलांनी मौजमजा करण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग पत्करला होता. फरासखाना पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लाखोंचा ऐवज जप्त केला आहे. महागडे डिजिटल कॅमेरे, हायटेक सायकल आणि टू व्हीलर्स... पुण्याच्या फरासखाना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं हा लाखांचो ऐवज जप्त केला आहे. मात्र ज्या टोळीकडून हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यांचा चेहरा तुम्हाला दाखवू शकत नाही. ही चोरी नववी आणि दहावीतल्या 4 विद्यार्थ्यांनी केली आहे. सराईत चोरांच्या टोळीलाही लाजवेल असा प्रताप पुण्यातल्या उच्चभ्रू घरातल्या चार अल्पवयीन मुलांनी केला आहे. कसबा पेठेतल्या एका शाळेसमोर एकाच क्रमांकाच्या दुचाकी उभ्या होत्या. ती वाहनं घेण्यासाठी कोण येतंय यावर पोलिस नजर ठेवून होते. मात्र ती वाहनं घेण्यासाठी जेव्हा शाळकरी मुलं आली तेव्हा पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी दुचाकीची डिक्की तपासली असता त्यांना महागडे कॅमेरे सापडले. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच हा सगळा ऐवज आपणच चोरला असल्याचं त्या मुलांनी कबूल केलं. चोरी करणाऱ्या मुलांचे पालक चांगल्या हुद्द्यावर कामाला आहेत. मात्र मुलांना मौजमजा करण्याची चटक लागली होती. त्यासाठी पालकांकडून मिळणारा पॉकेटमनी कमी पडत होता. चोरी करण्यात आलेला मुद्देमाल ऑनलाईन विकण्याचा मुलांचा डाव होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी पर्दाफाश केल्यामुळे मुलांचं पितळ उघडं पडलं. पालकांनी मुलांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं या घटनेनं पुन्हा अधोरेखित केलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















