![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune Fire: सदाशिव पेठमधील हॉटेलला भीषण आग, दहा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू
पुण्यातील (Pune Fire) सदाशिव पेठमधील एका हॉटेलला आग लागली. या आगीत एका दहा वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे
![Pune Fire: सदाशिव पेठमधील हॉटेलला भीषण आग, दहा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू Pune Fire at a hotel in Sadashiv Peth 10-year-old girl died Pune Fire: सदाशिव पेठमधील हॉटेलला भीषण आग, दहा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/53a92ef7060908597caec17e1e43142f166642336029689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यातील (Pune Fire) सदाशिव पेठमधील एका हॉटेलला आग लागली. या आगीत एका दहा वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झालाय. भिकारदास मारुती चौक परिसरातील ही घटना आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
इकरा नईम खान (सहा वर्षे) असे आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. सदाशिव पेठेतील भिकारदास मारुती जवळील एका हॉटेलमध्ये सकाळी पावणे अकराच्या सुमारास आग लागली. आग लागल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी अग्निशामक दलास दिली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एक महिला आणि तीन मुलं असल्याची माहिती जवानांना मिळाली. महिला आणि दोन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. हॉटेलच्या पोटमाळ्यावर अडकलेल्या मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, गंभीर जखमी झालेल्या मुलीला जवानांनी बाहेर काढले. त्यानंतर तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वी मुलीचा मृत्यू झाला.
अग्निशामक दलाने घटनास्थळावरील तीन सिलेंडर बाहेर काढले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. आग नेमकी कशा मुळे लागली हे समजू शकले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)