Pune Drugs Cases : मोठी बातमी! पुण्यात पुन्हा 340 किलो मेफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थ जप्त
पुण्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्सच्या तस्करींचं प्रमाण वाढलं आहेत.त्यातच मागील आठवड्यात 4000 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा ड्रग्स साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून (Drugs) ड्रग्सच्या तस्करींचं प्रमाण (PCMC News) वाढलं आहेत.त्यातच मागील आठवड्यात 4000 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा ड्रग्स साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी परिसरातून तब्बल 340 किलो ड्रग्ससाठा जप्त केला आहे. मेफेड्रॉन सदृष्य अंंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विश्रांतवाडी परिसरातून हा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. आरोपीच्या टेम्पोमधून हा ड्रग्स साठा जप्त केला आहे.
पोलिसाांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी विश्रांतवाडीत एक आरोपी सापडला होता. तो त्याचा माल ट्रकमध्ये देखील ठेवत होता. विश्रांतवाडी परिसरातून हा ट्रक पोलिसांच्या पथकाने शोधून काढला आहे. या आरोपीचं विश्रांतवाडीत गोडाऊन होतं. या गोडाऊनपासून तीन किलोमीटर अंतरावर हा कच्चा माल भरलेला ट्रक ठेवण्यात आला होता. याचं नेमकं काय करणार होते, याची चौकशी सुरु आहे.
पुणे शहर ड्रग्सचा विळख्यात अडकल्याचं दिसून येत आहे. मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात छापेमारी केली जात आहे. विविध परिसरात सध्या पोलीस नजर ठेवून आहे. प्रत्येक आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे. यातून मिळालेल्या माहितीवरुन विविध परिसरातून माहिती घेऊन पोलीस छापेमारी करत मेफोड्रॉन जप्त करत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्स प्रकरणात पिंपरी चिंचवडमधील PSI ला बेड्या
पिंपरी- चिंचवडमध्ये आढळलेल्या मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास शेळके असं अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच नाव आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रक्षक चौकात दोन कोटींच मेफेड्रोन ड्रग्स आढळलं होत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी नमामी झा ला अटक केली होती. अधीकच्या तपासात या ड्रग्स प्रकरणात आता निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेच नाव समोर आलंय.
ड्रग्स तस्करांवर नजर ठेवा; आयुक्तांचे आदेश
पुण्यात मोठं ड्रग्स रॅकेट पकडल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही ड्रग्स पकडण्यात आलं होतं. त्यानंतर दोन्ही शहरातील पोलिसांनी ड्रग्स तस्करीवर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. शहरात माहिती मिळेल त्या ठिकाणी अजून ड्रग्स विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
इतर महत्वाची बातमी-