एक्स्प्लोर

Pune Drugs Case News: पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात; पुरुषांसह महिला अन् परदेशी नागरिकांचाही समावेश, धक्कादायक आकडेवारी समोर

Pune Drugs Case News: पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला.

Pune Drugs Case News: पुण्यातून कोट्यवधींचे ड्रग्स (Pune Drugs) पकडले गेले असताना आता थेट सर्रासपणे विक्री करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला. फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटलेमधून सर्रास ड्रग्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले. सदर प्रकरणात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारमालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी आठही जणांना पुणे पोलीस करणार कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला. याचदरम्यान पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. 

पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात-

नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 मध्ये 155 गुन्हे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह बाकी पोलिस ठाण्यांमध्ये एनडीपीएस अॅक्टअंतर्गत 1 नोव्हेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 155 गुन्हे दाखल झाले आहेत. यात  215 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

17 कोटी 84 लाख 46 हजार 2055 रुपयांचा मुद्देमाल जप्त-

पोलिसांनी गांजा, कोकेन, चरस, एमडी, मशरूम, कॅथा इडुलीस खत, दोडा पावडर, एमडीएमए, अफिम, ब्राऊन शुगर, एलएसडी पेपर, हॅश ऑईल, ओझीकुश गांजा, बंटा, टॅब निद्राझिप, टॅब निद्रावेट, हेरॉईन आणि मॅस्केलाईन ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. 

215 आरोपींमध्ये 190 पुरुष, 15 महिला, तर 10 परदेशी नागरिकांचा समावेश

2024 मार्च महिन्यात 3 हजार 674 कोटींचे एमडी जप्त मार्च 2024 मध्ये पुणे पोलिसांनी कुरकुंभ येथील कारखान्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले होते. यावेळी 3 हजार 674 कोटी रुपयांचे तब्बल 1 हजार 8360 किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले होते.

नेमकं प्रकरण काय ? 

पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येतात. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. त्यामुळे, पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे. 

दोन पोलिसांचं निलंबन-

पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यात विरोधकांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर प्रशासनाकडून धडक कारवाई सुरु करण्यात आली. शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील दोन जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस निरिक्षक (गुन्हे) अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कामात हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय संबंधित हॉटेलही सील करण्यात आले आहे. 

संबंधित बातमी:

पुणे ड्रग्ज प्रकरण, सुषमा अंधारेंकडून आरोपांच्या फैरी, शंभूराज देसाईंकडून जोरदार प्रत्युत्तर, पाहा VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget