एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करुन मृतदेह पुरले
पुणे : पुण्यात पती-पत्नीसह त्यांच्या 12 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करुन तिघांचे मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आले आहेत. पुण्यातील खेड तालुक्यातल्या कुरकुंडीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
45 वर्षीय रोहिदास बाळू गोगावले, 40 वर्षीय मंदा रोहिदास गोगावले आणि 12 वर्षीय अंकिता गोगावले यांचे मृतदेह सापडले आहेत.
गोगावले दाम्पत्याची हत्या करुन मृतदेह शेतात पुरल्याची बातमी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आली होती. तर त्यांची मुलगी अंकिता बेपत्ता होती. मात्र दुपारी पुरलेले मृतदेह काढताना अंकिताचाही मृतदेह सापडला.
एकाच कुटुंबातील तिघा जणांच्या झालेल्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन हत्येचा तपास सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
पुणे
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement