Pune Crime News : आमच्यासोबतही वाईट कृत्य केलं; निवासी शाळेच्या संचालकाविरोधात इतर मुलींचा पोलिसांत जबाब; नौशाद शेखवर आणखी तीन गुन्हे दाखल
नौशाद शेखवर आणखी तीन गुन्हे दाखल झालेत. नौशादने त्याच्या क्रिएटिव्ह ऍकॅडमी अर्थात निवासी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केले होते. याप्रकरणी त्याला बेड्या ठोकताच, अन्य विद्यार्थिनी ही आता पुढं येताना दिसत आहेत.
![Pune Crime News : आमच्यासोबतही वाईट कृत्य केलं; निवासी शाळेच्या संचालकाविरोधात इतर मुलींचा पोलिसांत जबाब; नौशाद शेखवर आणखी तीन गुन्हे दाखल pune crime news three case file against Naoshad Sheikh in Pimpri chinchwad rape case in school Pune Crime News : आमच्यासोबतही वाईट कृत्य केलं; निवासी शाळेच्या संचालकाविरोधात इतर मुलींचा पोलिसांत जबाब; नौशाद शेखवर आणखी तीन गुन्हे दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/a176e3152ef8ffc82b9d8b0829251e461707473228999442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी-चिंचवड, पुणे : पिंपरी चिंचवडमधील शिक्षण संस्थेचे संचालक (Pune Crime news) नौशाद शेख याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणात (Pune rape) आत्तापर्यंत 5 पीडितांनी पुढे येत फिर्याद नोंदविली आहे. तसेच अन्य काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी पोलिसांकडे साक्ष नोंदविली आहे. त्यामुळे नौशाद शेखवर आणखी तीन गुन्हे दाखल झालेत. नौशादने त्याच्या क्रिएटिव्ह ऍकॅडमी अर्थात निवासी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केले होते. याप्रकरणी त्याला बेड्या ठोकताच, अन्य विद्यार्थिनी ही आता पुढं येताना दिसत आहेत.
आणखी तीन विद्यार्थिनींनी त्यांच्यावर अत्याचार झाल्याची फिर्याद दिलीये. त्यामुळं नौशाद शेखवर आत्तापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत. नौशाद शेखला निवासी शाळेत चाळे करताना पाहिलेल्या काही विद्यार्थिनींनी जवाब दिले आहेत. त्या सबळ पुराव्यांच्या आधारे नराधम नौशादला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पावलं टाकली जात आहेत. अन्य विद्यार्थिनींसोबत असे काही प्रकार घडले असल्यास त्यांनी पुढं यावं, असं आवाहन पोलिसांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
2 फेब्रुवारीला क्रिएटिव्ह अॅकॅडमीचे संचालक नौशाद अहमद शेख याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या प्रकरणी नौशाद याला अटक करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर येथे नौशाद अहमद शेख क्रिएटिव्ह अॅकेडमी ही निवासी शाळा चालवतो. 2021 मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी तिला नववीमध्ये निवासी शाळेत प्रवेश घेऊन दिला होता. त्यासाठी पीडितेच्या वडिलांनी दोन लाख 26 हजार रुपये मोजले होते. मुलींच्या हॉस्टेलच्या पहिल्याच मजल्यावर नौशाद शेख राहायचा. पीडित मुलगी 14 वर्षांची असताना शेख याने मुलीवर अत्याचार केले. 2022 मध्ये फ्लॅटवर बोलवून पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने शेख याला प्रतिकार केला. त्यावेळी त्याने पीडितेला धमकी दिली होती.
शाळेवर आम्ही बुलडोझर चालवू; हिंदू संघटनांचा इशारा
विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नौशाद शेख विरोधात भाजपसह हिंदू संघटना एकवटल्या आहेत. त्याची क्रिएटिव्ह अकॅडमी अर्थात निवासी शाळेवर आम्ही बुलडोझर चालवू असा इशाराच भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी दिला. नौशाद शेखने 2014 साली असंच कृत्य केलं होतं. तेंव्हाचं त्याच्यावर कठोर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं त्याचं धाडस वाढत चाललंय. त्याची ही वृत्ती ठेचण्याची गरज आहे. त्यामुळं त्याचं वकीलपत्र कोणीच घेऊ नये, असं आवाहन भाजपच्या आमदार उमा खापरेंनी केलं आहे. मात्र यातच आता अनेक मुली समोर येण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune Crime News : पुण्यातील भाईंना भरली खाकीची धडकी; रिल्स डिलीट करायला सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)