एक्स्प्लोर

Pune Crime news : मोबाईल पाहतो म्हणून आई रागावली, संतापलेल्या मुलानेच केली आईची हत्या; पुण्यातील प्रकार

Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभ्यास करताना सारखा मोबाईल पाहतो म्हणून रागवल्याने मुलाने आईचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune Crime news : पुण्यात गुन्हेगारीच्या (crime news) प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभ्यास करताना सारखा मोबाईल पाहतो म्हणून रागवल्याने मुलाने आईचा खून केल्याची घटना समोर आली आहे. 18 वर्षीय तरुणाने स्वतःच्या आईला भिंतीवर ढकलून, गळा दाबून खून केल्याचं  पोलीस चौकशीत समोर आलं आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील उरळी कांचन भागात ही घटना बुधवारी दुपारी घडली होती. 

तस्लिम शेख (37) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिचा मुलगा जिशन शेख (18)  असं मुलाचं नाव आहे. तस्लिम शेख या इंदापूर तालुक्यातील भिगवण ग्रामपंचायतच्या सदस्या आहेत. तस्लिम शेख या त्यांच्या पती आणि मुलासह उरळी कांचन भागात राहायला होत्या. सुरुवातीला तस्लिम यांनी आत्महत्या केली, अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. मात्र शवविच्छेदन झाल्यानंतर ही आत्महत्या नसून खून आहे, असं निष्पन्न झाले. पोलिसांांनी घरातील व्यक्तींची चौकशी केली असता जिशनने सगळा प्रकार सांगितला.

रागावल्याने रचना आईच्या मृत्यूचा बनाव

जिशन हा बारावीला आहे हा अभ्यास करत असताना मोबाईल त्याच्या आईने त्याला मोबाईल पाहतो म्हणून रागवून मारलं होतं. याचा राग अनावर झाल्याने जिशनने त्याच्या आईला भिंतीवर ढकलले आणि तिचा गळा दाबून खून केला. घाबरलेल्या जिशनने त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून आईच्या हाताची नस कापली मात्र रक्त न आल्याने त्याने मृतदेहाला पंख्याला लटकवले आणि तिने आत्महत्या केली असा बनाव केला. 

मुलाने स्वत:च दिली कबुली...

15 तारखेला (बुधवारी) पोलिसांना तस्लीम शेख यांनी आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक शवविचछेदन अहवालासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालात गळा दाबून आणि डोक्याला जखम झाल्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी पती जमीर शेख आणि मुलगा यांची वेगवेगळी चौकशी केली. त्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. मुलगा मोबाईलमध्ये पाहत बसला असता त्याची  आई तस्लीमने रागावून मारल्यामुळे मुलाला राग आला आणि रागाच्या भरात मुलाने आईचा भिंतीवर डोके आपटून खून गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget