Pune Crime News: पुण्यात स्पा सेंटरवर छापा; एका मॉडेलसह सहा महिलांची सुटका
पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचून स्पा सेंटरवर छापा टाकला. यात एका माॅडेलसह एकूण सहा पीडित महिलांची सुटका देखील करण्यात आली आहे.
Pune Crime News: पुण्यातील (Pune) औंध परिसरात पुणे पोलीस आणि सामाजिक सुरक्षा विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्पा (spa center) सेंटरच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून चतुश्रृंगी पोलिस स्टेशनकडून या स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला आहे. यात सहा आरोपी असल्याची माहिती असून त्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून बाकी आरोपींचा शोध सुरु आहे. एका माॅडेलसह एकूण सहा पीडित महिलांची सुटका देखील करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या परिसरात म्हणजेच औंध परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून 'द व्हाईट व्हीलो स्पा सेंटर सुरु होता. याच परिसरात अनेकांची ये-जा असते. मात्र पोलिसांना या ठिकाणी सुरु असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला आणि या स्पा सेंटरवर छापा टाकला. याच सेंटरमध्ये सात पीडित महिला सापडल्या. सहा पैकी एक महिला मॉडेल आहे. या सातही महिलांची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणात सात आरोपी असल्याची माहिती असून त्यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विमान नगरमध्येही घडला होता असा प्रकार
पुण्यातील अनेक स्पा सेंटरवर अशा प्रकारचा अवैध वेश्या व्यवसाय सुरु असतो. त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यापुर्वी पुण्यातील विमाननगर भागात मसाज सेंटरच्या नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला होता. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली होती. वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली होती. 'जस्ट डायल'वर विमाननगर परिसरातील मसाज पार्लरबाबत माहिती उपलब्ध होती.स्पा सेंटरमधील कामगारांकडून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला जात होता. त्यानंतर त्याला ग्राहक बनवून मसाजच्या नावाखाली जास्तीचे पैसे उकळल्या जात होते. जास्त पैसे उकळून वेश्याव्यवसाय केला जात होता, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आली आहे.