Pune Crime: पुण्यात स्कुलबस ड्रायव्हरने केलेल्या अत्याचाराच्या घटनेने संताप; वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडली व्हॅन
Pune Crime: पुण्यात स्कुलबस ड्रायव्हरने केलेल्या अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त केला जातोय. वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी या स्कूल व्हॅनवर दगडफेक केली.
पुणे: स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 45 वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्यासोबत लैंगिक चाळे केले. एका पिडीत मुलीने पालकांना ही माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली. या घटनेनंतर आता पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर काही संघटनेकडून ज्या स्कूलव्हॅनमध्ये अत्याचार करण्यात आला, ती व्हॅन काही संघटनांकडून फोडण्यात आली आहे आणि संताप व्यक्त करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)
वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी या स्कूल व्हॅनवर दगडफेक केली. पंधरा ते वीस कार्यकर्ते अचानक आले आणि त्यांनी या स्कूलवर दगडफेक केली आहे. यातील काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आमच्या मुली शाळेत कोणाच्या विश्वासावर पाठवाव्यात आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय घडलं?
स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 45 वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडित मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले. एका पिडीत मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पिडीत मुलींची प्रकृती व्यवस्थीत आहे. नियमाप्रमाणे प्रत्येक स्कुल बसमधे एक महिला केअर सेंटर असणं बंधनकारक आहे. या स्कुल बसमधील महिला केअर टेकर यावेळी स्कुल बसमधे होती का हा प्रश्न उपस्थित होतोय. (Pune Crime News)
पोलिसांनी याप्रकरणी काय म्हटलंय?
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 अल्पवयीन मुलींच्या आईंची तक्रार आहे. त्यांच्या दोन मुलींच्या प्रायव्हेट पार्टला टच केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. आरोपीला अटक केली आहे. स्कूल बस मध्ये महिला मदतनीस होती का याचा तपास करत आहोत. स्कूल बस शाळेची होती की, भाडेतत्त्वावर घेतलेली याबाबत माहिती घेत आहोत. विद्यार्थी वाहतुकी संदर्भात नियमांचा उल्लंघन झालं का याचा तपास करत आहोत. शाळा प्रशासनाशी संपर्क सुरू आहे. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे.