एक्स्प्लोर

Kishor Aware Murder case : किशोर आवारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलिसांच्या संशयाने खळबळ, मुलगा गौरव नाही तर वडिलांनीच....

पुण्यातील तळेगावच्या जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्यासाठी या हत्येचं कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं.

Kishor Aware Murder case : पुण्यातील तळेगावच्या जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्यासाठी या हत्येचं कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. मात्र या हत्येमागे गौरवचा प्लॅन नसून खुद्द भानू खळदेचा प्लॅन असल्याचं  समोर येत आहे. भानू खळदे यांनीच हा कट रचल्याचा  पोलिसांना संशय आहे त्यामुळे आता पोलीस या भानू खळदेचा तपास करत आहे. 

मावळ तालुक्यातील तळेगाव नगर परिषदेसमोर जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. 12 मे रोजी किशोर आवारे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अगोदर 7 जणांना अटक केलेली आहे. त्यांना आजा न्यायालयाने 25 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.

मुलगा गौरवने हा कट रचल्याचं समोर आलं होतं. त्याने हा कट  का रचला?, त्यामागचं कारण हे जुन्या नगरपरिषद इमारतीपर्यंत जाऊन पोहोचलं होतं. माजी नगरसेवक भानू खळदे यांच्याविरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती, असा दावा भानू खळदे यांनी केला होता. मात्र यावरुन आवारे यांनी भानू खळदे यांना सर्वांदेखत कानशिलात लगावली होती. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेनी हत्येचा कट रचल्याचं समोर आलं होतं. मात्र आता याच प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

भानू खळदे पसार...

सध्या भानू खळदे हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. त्यांची चौकशी केली जाणार आहे. भानू खळदे यांच्या कानशिलात लगावल्यानंतर  त्यांच्यामुलाने हत्या करुन घेतल्याचं समोर आल्यानंतर कट कसा रचला हे समोर आलं होतं. आवारेंचा गौरवने किशोरचा काटा काढायचं ठरवलं होतं. जानेवारी पासूनच हत्येचा कट रचायला सुरुवात केली होती. मित्र श्यामकडून ही हत्या करुन घ्यायचं ठरलं होतं. आर्थिक मदत करणाऱ्या मित्रासाठी श्यामने होकार दिला होता. श्याम आणि रघु उर्फ प्रवीण धोत्रे सोबत हत्या कशी करायचं हे ठरवलं. श्याम आणि प्रवीणने इतर मित्रांना सोबतीला घेतलं. गेल्या महिन्यापासून रेकी करायला सुरुवात झाली. अखेर नगरपरिषद कार्यालयात किशोर आवारेला गाठण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली. मात्र हा कट त्यांच्या मुलाने नाही तर  खुद्द भानू खळदे यांनी रचल्याचा संशय आहे. 

संबंधित बातमी-

Kishor Aware Murder case : माजी नगरसेवकाच्या मुलाकडून किशोर आवारेंचा खून; 'या' घटनेचा घेतला बदला; कसा रचला हत्येचा कट?

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...
Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget