एक्स्प्लोर

Pune crime news : पुण्यातील गुन्हेगारांचा नवा फंडा; ड्रग्ज विकण्यासाठी इमोजीचे कोडवर्ड, पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यातच आता अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी तरुणांकडून कोडवर्डचा वापर होत असल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

Pune crime news : पुण्यात अमली पदार्थ विकणाऱ्यांनी (Pune)  आता नवा फंडा शोधून  (Crime Capital)  काढला आहे. इमोजीचा वापर करुन आता अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचं समोर आलं आहे. पुणे शहर पोलिसांनी मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे शहर अमली पदार्थांचे हॉटस्पॉट ठरत आहे. या प्रकरणात पोलिसांना आता नवीन माहिती मिळाली आहे. अमली पदार्थ विकत घेण्यासाठी पेडलर आणि ग्राहक म्हणजे विकत देणारे आणि विकत घेणारे हे पोलिसांच्या किंवा तपासयंत्रणाच्या लक्षात येऊ नये म्हणून कोडवर्डमध्ये एकमेकांशी संवाद साधत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे 

अमली पदार्थाच्या अधीन झालेली तरूणाई पकडली जाऊ नये, यासाठी अमली पदार्थांचे व्यवहार करण्यासाठी  व्हाट्सअपवरील इमोजीचा वापर करत आहेत. विशिष्ट अमली पदार्थासाठी विशिष्ट प्रकारच्या इमोजी वापरल्या जात आहेत. त्यामुळे एकीकडे अमली पदार्थ विरोधी सप्ताह साजरा करणाऱ्या पोलिसांसमोर या तस्करांना रोखण्याचे मोठं आव्हान निर्माण झाल आहे.

Pune crime news : पाहूयात कोणते कोडवर्ड कोणत्या अंमली पदार्थासाठी वापरले जातात …

गांजा 🍀😢
कोकेन 👃😝
MDMA 💊
मशरूम 🍄
हेरॉईन 💉

तपासयंत्रणांना गुंगारा देण्यासाठी शोधलेल्या इमोजी कोडवर्ड पोलिसांनी डिकोड केले आहेत. आता यापुढे सायबर सेलकडून इमोजी वापरून अंमली पदार्थांच ॲानलाईन संभाषण करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे आपण पोलिसांच्या दोन पावलं पुढे आहोत असं जरी पेडलर आणि अंमली पदार्थ खरेदी करणारे यांना वाटत असेल तर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येणार आहे.

सध्या देशभरात अंमली पदार्थ विरोधी सप्ताह साजरा होत आहे. आयुष्य उद्धवस्त करणारे अंमली पदार्थ वेळीच सोडून चांगल्या आयुष्याकडे वळण्याची चांगली संधी आहे. नाहीतर कधी ना कधी तुरूंगात खडे फोडायला जाण्याची वेळ येऊ शकते.

Pune crime news :  पुण्याचं क्राईम कॅपिटल बनतंय?

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता क्राईम कॅपिटल म्हणून होते की काय असं चित्र निर्माण झालं आहे. हे कदाचित तुम्हाला पटणार नाही. मात्र मागील काही दिवसात पुण्यात घडलेल्या घटनांनी अक्षरशः महाराष्ट्र हादरला आहे. कधी बलात्कार, प्रेमातून हत्या, गाड्यांची तोडफोड तर कधी अल्पवयीन मुलांकडून होत असलेली अमली पदार्थांची विक्री... या सगळ्या घटना पाहून पुण्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाबZero Hour Rahul Gandhi vs Narendra Modi:राहुल गांधी यांचं वक्तव्य ते नरेंद्र मोदी यांची सडेतोड उत्तरZero Hour : अंबादास दानवेंचं निलंबन ते नार्वेकरांचं आमदारकीसाठी लॉबिंग; विधानपरिषदेत काय घडलं?Zero Hour Full : दानवेंचं निलंबन, ठाकरे-फडणवीसांची भेट ते मोदींचं भाषण; दिवसभरात काय घडलं? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget