Pune Crime News : पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सात गावात छापे; गावठी दारूसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारुविरोधात मोहीम राबवली असून त्यांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे विभागीय भरारी पथकाने जिल्ह्यात सहा गावात छापे टाकत 995 लिटर गावठी हातभट्टी दारूसह 7 लाख 90 हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
![Pune Crime News : पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सात गावात छापे; गावठी दारूसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त Pune Crime News Cash worth Rs 7 lakh seized in state excise drive Pune Crime News : पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सात गावात छापे; गावठी दारूसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/13/4070f71bfb50bf28e1ccb160fc7a6f261707825004695442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारुविरोधात मोहीम (State Excise Department Pune) राबवली असून त्यांनी मोठी कारवाई केली आहे. आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने जिल्ह्यात सहा गावात छापे टाकत 995 लीटर गावठी हातभट्टी दारूसह 7 लाख 90 हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भरारी पथकाने गेल्या दोन दिवसात सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळींब, राजेवाडी आणि आंबळे या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 5 वारस आणि 3 बेवारस अशा 8 गुन्ह्यांची नोंद करून 995 लिटर गावठी हातभट्टी दारू, 25 हजार लिटर रसायण, 3 दुचाकी वाहने आणि गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्याची कारवाई सुरू आहे. यापुढेदेखील पुणे विभागाचे राज्य उत्पादन शुल्क उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार अशा प्रकारच्या मोहिमा आखून अवैध दारू व्यवसायावर सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर
राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर अवैद धंद्यांवर करडी नजर असल्यांचं दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी जुना मुंबई पुणे हायवेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूच्या 60 हजार बाटल्या जप्त केल्या होत्या. 600 बॉक्समध्ये लपवण्यात आलेल्या बनावट मद्याची किंमत 21 लाख रुपये होती. जुन्या मुंबई पुणे मार्गावर असलेल्या मामुर्डी गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली होती. 23 जानेवारी रोजी एक ट्रक जुना मुंबई पुणे हायवे रोडवर, मामुरडी गावाजवळ येथून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार, सापळा रचून अधिकारी कर्मचाऱ्यांनी तो ट्रक (DD-01-2-9205) अडवला आणि त्याची तपासणी केली. या ट्रक मध्ये गोवा राज्यात निर्मित बनावट देशी दारू रॉकेट असल्याचं समोर आले. पोलिसांनी संत्रा 90 मि.ली. क्षमतेच्या 60,000 बाटल्या (600 बॉक्स) एव्हढा मुद्देमाल मिळून आला. या मुद्देमालाची किंमत तब्बल 21 लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात 15 लाखाच्या वाहनासह एकूण 36 लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला होता.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)