Pune Crime News: पुण्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर; छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड जप्त, गणेश उत्सवाच्या तोंडावर पुण्यात ATSची मोठी कारवाई
Pune Crime News: पुणे गणेश उत्सव पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला आहे.
![Pune Crime News: पुण्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर; छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड जप्त, गणेश उत्सवाच्या तोंडावर पुण्यात ATSची मोठी कारवाई Pune Crime News Anti-Terrorist Squads Big Action in Pune Against Ganesh Utsav 3788 SIM cards were seized in the raid in Kondhwa Pune Crime News: पुण्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर; छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड जप्त, गणेश उत्सवाच्या तोंडावर पुण्यात ATSची मोठी कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/030f1abf7d289f15426cef92f892dea81724921758408442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: पुण्यात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद वस्तू आणि सामान जप्त करण्यात आले आहे. या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड सात सिम बॉक्स वाय फाय आणि सिम्बॉक्स चालविण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना लॅपटॉप सह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे. (Pune Crime News)
विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू होतं. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्ष तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोंढव्यातील मिठा नगर येथे असलेल्या एम.ए.कॉम्प्लेक्स परिसरात अधिकृत एक्सचेंज सेंटर सुरू होतं.
दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा दहशत विरोधी पथक सध्या तपास करत असून ताब्यात घेण्यात आलेल्या नौशादकडे पोलीस चौकशी (Pune Crime News) करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)