एक्स्प्लोर

Pune Crime News : मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा चाकूने वार करून हत्या; पुण्यात मुलंही असुरक्षित?

Pune Crime News :   मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पुण्यातील सहकार नगरमधील तळजाई टेकडीजवळ ही घटना घडली आहे.

Pune Crime News : मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने (pune Crime) वार करुन हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील (pune) सहकारनगरमधील (Sahakar nagar Pune) तळजाई टेकडीजवळ ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी (8 डिसेंबर) सायंकाळी मित्र आणि मैत्रिणीसोबत तळजाई टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने वार करुन हत्या करण्यात आली. साहिल कसबे (वय 19 वर्षे) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला साहिल हा गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास काही मित्र आणि मैत्रिणी सोबत तळजाई टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. टेकडीवर साहिल हा मैत्रिणीसोबत बसला असताना तीन आरोपी त्या ठिकाणी आले. दुसऱ्यांच्या मैत्रिणी सोबत कशाला फिरत असतोस असे म्हणून आरोपींनी त्याच्यासोबत वाद घातला. आधी त्याला लाकडी बांबूने मारहाण केली. तर एका आरोपीने चाकूने त्याच्या मानेवर, पोटावर आणि डोक्यावर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साहिल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोन आरोपींची नावे देखील निष्पन्न झाली आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पुण्यात गुन्हेगारी संपता संपेना
आजच (9 डिसेंबर) घडलेल्या दुसऱ्या घटनेत पाच जणांच्या टोळीने तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. तू माझ्या मित्राचा मर्डर  केला, मी तुला जिवंत सोडणार नाही तुझी विकेटच पाडतो, असं म्हणत टोळीने हल्ला केला. पुण्यातील हडपसर परिसरातील म्हाडा वसाहतीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे आणि एक पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. शुभम शरद भंडारी याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारदार आणि टोळीतील मुलं एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तक्रारदार बाहेर जात असताना टोळीने कोयत्याने पाठीवर हल्ला केला. हा हल्ला तक्रारदार शेजारच्या घरात शिरला. तो बाहेर निघताच त्याचा पाठलाग केला. त्याला शिवीगाळ केली आणि पाचही जण मिळून त्याच्यावर हल्ला केला. या सगळ्या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole Nagpur : एक देश, एक निवडणूक वरून नाना पटोलेंची टीकाNitin Raut on Chhagan Bhujbal : भुजबळ आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत - नितीन राऊतPune Winter Cold : गुलाबी थंडीने पुणे गारठलं; 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :17 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Embed widget