Pune Crime News : वर्दीतला नराधम! 10 वर्षीय मुलगी क्लासवरुन घरी जात होती, रस्त्यात पोलिसांने अडवलं अन् नंतर थेट...
शाळेतून घरी येत असताना पोलिसानेच एका 10 वर्षाच्य़ा मुलीबरोबर अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नेमका विश्वास कोणावर ठेवावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील नारायण गाव परिसरातून एक (pune rape) धक्कादायक बातमी समोर येत आहे. लहान मुलीसाठी पोलीस संरक्षक नाही तर भक्षक ठरला आहे. शाळेतून घरी येत असताना एका 10 वर्षाच्य़ा मुलीबरोबर पोलिसांनेच अश्लील चाळे केले आहे. या प्रकारामुळे नेमका विश्वास कोणावर ठेवावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करुन पोलिसांला अटक करण्यात आली आहे.
एका 38 वर्षीय पोलिसानेच 10 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले आहे. नारायण भाऊसाहेब बर्डे, असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा पोलीस कर्मचारी सध्या पोलीस नाईक म्हणून जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याच्याविरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
पीडीत मुलगी ही चौथ्या वर्गात शिकते. ती खासगी क्लासवरुन दुपारी 1 वाजताच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी बर्डे याने मुलीला शंभर रुपये देतो, असं सांगत मोटरसायकलवर बस असा आग्रह केला. त्यावर या मुलीने बर्डेला नकार दिला. त्यानंतर बर्डेने तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं. हा सगळा प्रकार पाहून मुलगी घाबरली आणि रडत घरी गेली. ही सगळी घटना तिने तिच्या आजीला सांगितली. त्यावेळी पालक संतापले आणि त्यांनी मुलीच्या क्लासच्या रस्त्याचा शोध घेतला. त्यावेळी पोलीस दिसून आला. स्थानिकांनी बर्डे याला पकडून पोलिसांत स्वाधीन केलं. आरोपीने केलेल्या कृत्याचे सीटीव्ही फुटेज नागरिकांनी पोलीस स्टेशनला दिले आहेत. बर्डे हे चार वर्षांपासून ओतुर पोलीस स्टेशनमध्ये सेवेत आहेत.
वर्दीतला नराधम...
पुण्यात सध्या अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. त्यात अनेक क्षेत्रातील नराधमांचा समावेश आहे. याप्रकरणी अनेकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र आता पोलिसांनीच मुलीबरोबर अश्लिल चाळे केल्याने नक्की विश्वास कोणावर ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालकांकडून संताप व्यक्त...
या प्रकरणी मुलीच्या पालकांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. गावातील मुलींसोबत असा प्रकार घडत असेल तर अशा वर्दीतल्या नराधमावर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया पालक आणि गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मुलींच्या सुरक्षेता मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा-