Pune Crime: गणेश पेठेत 'मुळशी पॅटर्न' स्टाईल हत्या, तरूणाचा थरारक पाठलाग करत इमारतीच्या टेरेसवर कोयत्याने केला खून
पुण्यात कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.
पुणे: पुण्यात मागील (Pune Crime News) काही दिवसांपासून कोयता गँगच्या (Koyta gang) दहशतीत वाढत होताना दिसत आहे. अनेकांच्या मुसक्या आवळून देखील कोयता गँगचा हैदोस संपताना दिसत नाही आहे. पुण्यात मुळशी पॅटर्न चित्रपटाचा थरार पुन्हा पाहायला मिळाला. पुण्यात पाळलग करत कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला आहे. शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही ज्यांचा खून होतोय ते देखील आणि जे खून करताय ते देखील अगदी कमी वयाचे युवक असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुण्यात कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. पाठलाग करून कोयत्याने हल्ला करून खून केला आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पाठलाग करत तरूणाला इमारतीच्या छतावर गाठले आणि कोयत्याने वार करत तरुणाचा खून करण्यात आला आहे.किरकोळ वादामधून तरुणावर कोयत्याने वार करत खून केल्याची महिती मिळत आहे.
बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री घटना घडली
पुण्यातील गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली आहे. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सिद्धार्थ आणि आरोपींचे वाद झाले होते.आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले तो ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठत वार करून खून केला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार
किरकोळ कारणावरून पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार करण्यात आला आहे. हल्ल्यात एक तरुण जखमी झाला आहे. निलेश पिंपळकर असे फिर्यादीचे नाव आहे. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे असे आरोपींचे नाव असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा सगळा प्रकार पुण्यातील बाणेर भागात असलेल्या महाबळेश्वर हॉटेल जवळ घडला.पोलिसांना घटनास्थळावरून गावठी कट्ट्याचा एक जिवंत राऊंड आणि दोन केसेस जप्त केल्या आहेत.
हे ही वाचा :