Pune : पुण्यातील (Pune) बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या हद्दीत बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर भरदिवसा सार्वजनिक शौचालयात बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी (8 एप्रिल)  ही घटना घडली. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पुणे स्टेशन जवळील जनसेवा शौचालयात हा प्रकार घडला


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही कुटुंबीयांसह पुणे स्टेशन परिसरातच राहण्यास असून साफसफाईची कामे करते. शुक्रवारी (8 एप्रिल) दुपारी ते सार्वजनिक शौचालयात गेले असता आरोपी ही तिच्यापाठोपाठ शौचालयात गेला. त्यानंतर आरोपीनं त्या मुलीवर अत्याचार केले. पीडित मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मारवाडी नामक एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. 


 रूपाली चाकणकर यांनी या घटनेबाबत एक ट्वीट शेअर केले आहे.  






तसेच चित्रा वाघ यांनी देखील या घटनेबाबत ट्वीट शेअर केले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये 'महाराष्ट्रात अराजक माजले आहे…', असं लिहिलं आहे. 





आरोपी हा पीडितेच्या कुटुंबीयांचा चांगला ओळखीचा आहे. तो दररोज पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटत होता. तर हा प्रकार झाल्यापासून तो बेपत्ता आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


हे ही वाचा