पुणे : देशभरात किडनी तस्करीची अनेक प्रकरणं समोर येतात. अनेक वेळा किडनी तस्करीसाठी अपहरण, हत्या झाल्याचंही समोर आलं आहे. महाराष्ट्रातही किडनी तस्करीची अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत. आता पुण्यातही अशीच किडनी तस्करी आणि फसवणुकीची घटना समोर आली आहे. पुण्यात किडनी ट्रासंप्लांटसाठी किडनी काढून घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे.
पुण्यामध्ये एका महिलेला किडनी प्रत्यारोपणासाठी किडनी देण्यास सांगून 15 लाख रुपयांचे आमिष देण्यात आले. यानंतर किडनी ट्रान्सप्लांटसाठी किडनी काढून घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार देत फसवणूक करण्यात आली. असा आरोप एका महिलेने केला आहे. हा सर्व प्रकार प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये झाल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. एका महिलेने याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान तक्रार दाखल झाल्यानंतर रूबी हॉल क्लिनिकनेही याबाबत चौकशीची मागणी करणारे पत्र पोलिसांना दिले आहे.
काय आहे महिलेचा आरोप?
एका महिलेवर 24 मार्च रोजी किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर 29 मार्च रोजी किडनी दान करणाऱ्या महिलेने आपली फसवणूक झाल्याचं पोलिसांना सांगितलं. दरम्यान कोरेगाव पार्क पोलिसांनीही महिलेच्या तक्रार अर्जाची दखल घेत चौकशी केली. चौकशी अंतर्गत रूबी हॉल क्लिनिकमध्ये हा प्रकार घडल्याचं प्रथम तपासात निदर्शनास आलं. या प्रकरणाचा अधिक तपास कोरेगाव पार्क पोलिसांकडून सुरू आहे.
किडनी रॅकटेचा तपास करण्याची रुग्णालयाची मागणी
दरम्यान, रूबी हॉल क्लिनिकनेही किडनी रॅकेटचा तपास करण्यासाठी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. किडनी दान करणाऱ्या तक्रारदार महिलेने आपण किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाची नातेवाईक नसल्याचा खुलासा केला. तसेच आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला. यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. अवयव प्रत्यारोपणासाठीच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच प्रत्यारोपण केले, असे रुग्णालयाचं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1086 रुग्ण, 71 जणांचा मृत्यू
- BJP Foundation Day : आज भाजपचा 42वा स्थापना दिवस, बहुमताच्या सरकारमधून काढल्यानंतर दोन दिवसात वाजपेयी-अडवाणींनी केली भाजपची स्थापना
- Avesh Khan : 'सामन्यावेळी आई रुग्णालयात दाखल', लखनौच्या विजयाचा शिलेदार आवेश खानची माहिती, म्हणाला...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha