Pune Crime News: जेवणाच्या बिलावरुन दोघात वाद, बोपदेव घाटात दुचाकीसह मृतदेह फेकला
Crime News : जेवणाचं बिल देण्यावरून झालेल्या वादातून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नातेवाईकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नातेवाईकाचा मृतहेद बोपदेव घाटात टाकून दिल्याचंदेखील समोर आलं आहे.
Pune Crime News : पुण्यात किरकोळ वादातून (Pune) हत्या (murder) केल्याच्या घटनेत सातत्याने वाढ (pune news) होत आहे. जेवणाचं बिल देण्यावरून (hotel bill) झालेल्या वादातून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नातेवाईकाची (relative) हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकाचा मृतहेद बोपदेव (Bopdev ghat) घाटात टाकून दिल्याचंदेखील समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. किरण भागवत थोरात असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणामुळे बोपदेव घाटाच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Pune Crime News Update)
धनंजय हरिदास गायकवाड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी हरिदास गायकवाड यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. धनंजय गायकवाड आणि किरण थोरात हे दोघे नातेवाईक आहेत. त्या दोघांमध्ये जेवणाच्या बिलाच्या पैशावरुन भांडणं झाली होती. या भांडणाच्या रागातून धनंजय गायकवाड यांनी किरण गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंर 12 डिसेंबर रोजी धनंजय दारु पिऊन किरणच्या घरी आला होता. त्यांच्या घरात गोंधळ केला शिवाय किरण यांच्या आईला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याने किरणची आई धास्तावली. त्याचवेळी त्याने आईला जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली होती. किरण यांच्या घरावर दगडफेकही केली.
त्यानंतर किरण यांनी धनंयजसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. धनंजयसोबत गोड बोलून झाले गेले विसरून जा, मी तुला पैसे देतो, दारू पाजतो, असे म्हणून दुचाकीवरून दारू घेऊन त्याला बोपदेव घाटाच्या शेवटच्या टोकाला नेहले. घाटात त्याला दारु पाजली. त्याच वेळी धनंयजने दारुच्या नशेत किरण याला आणि त्यांच्या तीन महिन्याच्या मुलीला मारून टाकेन, अशी धमकी दिली आणि पाठीत दगड मारला. त्याचवेळी किरण याने तोच दगड घेत धनंजय याच्या डोक्यात घातला. त्यांच्या छातीवर देखील मारहाण केली. या मारहाणीत धनंजयचा मृत्यू झाला.
बोपदेव घाटात ढकलून दिलं..
किरण याने धनंजयची हत्या केली. त्यानंतर किरण घाबरला होता. सोपा उपाय म्हणून त्याने धनंजयच्या मृतदेहाला पुण्यातील बोपदेव घाटातील दरीत ढकलून दिलं. त्यासोबत त्याची गाडीदेखील बोपदेव घाटात ढकलली. या प्रकरणाचा कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपी किरण थोरात काही दिवस पसार होता. आरोपी चिंचवड परिसरात लपून असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलीस सध्या किरण याची कसून चौकशी करत आहेत.