Pune Crime : शिक्षणाच्या माहेर घरात भाईगिरी थांबेना! तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, दहशत माजवत रील बनवून केलं व्हायरल
Pune Crime : पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस क्षुल्लक कारणावरून वाद, हाणामारी, खून यांचेे प्रमाण प्रचंड वाढत चाललं आहे.

Pune Crime: पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी (Pune Crime) वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस क्षुल्लक कारणावरून वाद, हाणामारी, खून यांचेे प्रमाण प्रचंड वाढत चाललं आहे. हातात कोयता घेऊन परिसरात दहशत निर्माण करणं असो किंवा मग सोशल मिडियावर रील शेअर करून दहशत (Pune Crime) निर्माण करणं असो असे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे कि नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिझ्झा मिळाला नाही म्हणून हॉटेल चालकाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता शहर परिसरात हा खळबळजक प्रकार घडला आहे. तरुणावर धारदार शस्त्राने चौघांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या वाघोली परिसरातील बकोरी फाट्यावरील जय महाराष्ट्र खाऊ गल्लीत एका तरुणावर कोयत्याने हल्ला (Pune Crime) केला, या हल्यात तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर तरुणांनी मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर ठेवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमधील चारही आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, लोणीकंद पोलीस तपास करत आहे
या घटनेमध्ये प्रमोद देशमुख हा तरूण जखमी झाला आहे. तर हल्लेखोरांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. प्रमोद देशमुखवर कोयत्याने हल्ला (Pune Crime) करण्यात आला. या हल्यात तो गंभीर जखमी झाला. या आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) देखील व्हायरल केला आहे. हे चारही आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पिझ्झा देण्यावरून हॉटेल मालकाला मारहाण
पिझ्झा न दिल्याने हॉटेल चालकाला मारहाण (Pune Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खराडी परिसरात घडला आहे. ही घटना 28 जुलै रोजी खराडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, विशाल सातव या चौघांवर (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल बंद करुन मालक निघाला होता. त्यानंतर हे चौघे त्या हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी पिझ्झा मागत होते. हॉटेल मालकाने हॉटेल बंद झाल्याचं सांगितलं याचा राग मनात धरून थेट हॉटेल मालकाला मारहाण (Pune Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 28 जुलै रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली आहे. हॉटेलचालकाला दगडाने मारहाण केल्यामुळे तो जखमी झाला. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
