एक्स्प्लोर
महावितरणच्या उघड्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, चिमुरडा जखमी
चेंडू आणण्यासाठी 12 वर्षांचा अबू ट्रान्सफॉर्मरजवळ गेला, तेव्हा छोटा स्फोट झाला आणि त्यात तो गंभीररित्या भाजला.
पुणे : उघड्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्यामुळे पुण्यात 12 वर्षांचा मुलगा गंभीररित्या भाजला आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
पुण्यातल्या आशिर्वाद सोसयाटीत राहणारा 12 वर्षांचा अबू शेख रविवारी इमारतीखाली क्रिकेट खेळत होता. खेळताना उघड्या ट्रान्सफॉर्मरजवळ गेलेला चेंडू आणण्यासाठी तो गेला, तेव्हा ट्रान्सफॉर्मरजवळ छोटा स्फोट झाला आणि त्यात अबू गंभीररित्या भाजला.
अबूचे दोन्ही हात, छाती, पाठ आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वारंवार तक्रार करुनही महावितरणनं 22 हजार व्होल्ट क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरभोवती कुंपण का घातलं नाही असा सवाल स्थानिकांनी विचारला आहे.
रहिवासी भागातल्या ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षेबद्दल कडक नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र महावितरणकडून त्यांचं पालन होत नाही आणि अबूसारख्या अनेकांच्या ते अंगलट येऊ शकतं. या निष्काळजीपणाला कारणीभूत ठरणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement