एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : अजितदादांसारखा नेता आमच्यासोबत असल्यामुळं पुण्याच्या विकासाला गती मिळेल : देवेंद्र फडणवीस   

पुण्यावर प्रेम करणारा अजित पवार यांच्यासारखा नेता आमच्यासोबत असल्यामुळं विकासाला आणखी गती मिळेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Devendra Fadnavis :  पुण्यावर प्रेम करणारा अजित पवार यांच्यासारखा नेता आमच्यासोबत असल्यामुळं विकासाला आणखी गती मिळेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केलं. चांदणी चौकातील (Chandani Chawk Flyover) नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. वाहतूक कोंडीत अडकून लोकांना दिवसा चांदण्या दिसायच्या म्हणून या चौकाला चांदणी चौक हे नाव पडले असे मला वाटत होते. पण अजित पवारांनी माझ्या ज्ञानात भर घातली. अजितदादांनी या चौकाला चांदणी चौक हे नाव का पडलं ते सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. 

पुणे हे विचारवंतांचे शहर आहे. इथे निर्णय घेणे सोपे नाही. एखाद्या प्रकल्पासाठी लोक तीन वेगवेगळ्या देशातील संस्थांचे रिपोर्ट आणतात. पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रोपेक्षा आधी सुरु झाले होते. मात्र  नागपूर मेट्रोचे काम आधी पूर्ण झाल्याचे फडणवीस म्हणाले. दरम्यान,गडकरी साहेबांचे पुण्यावर, राज्यावर असलेल्या प्रेमामुळं वेगवेगळे प्रकल्प होत आहेत, याचा आनंद असल्यचे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांदेही पुण्यावर प्रेम आहे. पंतप्रधान मोदीजी जेवढ्या वेळा पुण्यात आले तेवढ्या वेळेस दुसरे कोणतेही पंतप्रधान पुण्यात कधी आले नाहीत. ते आणखीही पुण्यात येतील असे फडणवीस म्हणाले. 

पुण्याच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न

पुण्याच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गडकरी साहेब आणि राज्य सरकार करेल असे फडणवीस यावेळी म्हणाले. नितीन गडकरी यांच्यासारखे दृष्टे नेते आपल्याकडे आहेत. गेल्या नऊ वर्षामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं आहे. पायाभूत सुविधा वाढत असल्याचे फडणवीस म्हणाले. अलिकडे मी एक सर्वे वाचला. यामध्ये दहा किलोमीटर जाण्यासाठी 30 मिनीटांचा वेळ लागतो. त्यामुळं जो देशातील पहिल्या सहा ट्रॅफिक जाम असलेल्या शहरात पुण्याचा नंबर लागतो. त्यामुळं पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करणं गरजेचं असल्याचे फडणवीस म्हणाले. वाहतूक कोंडी संपवण्यासाठी उड्डाणपूल करणे गरजेचे आहे. आता आपण ज्या वेगानं काम करतोय, त्यामुळं वाहतूक कोंडी फोडणे शक्य होणार असल्याचे फडणवीस म्हणाले. 

मुळा मुठा नदीच्ं शुद्धीकरण केलेलं पाणी एमआयडीसीला देता येईल

मुळा आणि मुठा नदीचे शुद्धीकरणाचे काम केंद्र सरकारनं हाती घेतले आहे. त्यामुळं आता पुढच्या काळात मुळा मुठा नदीच्ं शुद्धीकरण केलेलं पाणी एमआयडीसीला देता येईल. त्यामुळं धरणांच्या पाण्यात बचत होईल असेही फडणवीस म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Ajit Pawar Chandani Chowk : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघंही वेडे नाहीत, असं अजित पवार का म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget