Ajit Pawar Chandani Chowk : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघंही वेडे नाहीत, असं अजित पवार का म्हणाले?
अजित फडणवीस आणि माझा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. एकच खुर्ची असं शक्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

पुणे : देवेंद्र फडणवीस आणि माझा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे अशा चर्चा आणि बातम्या चालवल्या जातात मात्र खुर्ची एक आहे आणि त्यावर दोघांचा डोळा आहे, असं शक्य नाही. मुळात मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिक्त नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघंही वेडे नाहीत, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
"तब्येतीच्या कारणाने मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत. पत्रकारांनी याची नोंद घ्यावी. अलीकडे ते रुसले- फुगले अशा बातम्या सुरु झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जर राज्याच्या विकासासाठी पैसे दिले तर का घ्यायचे नाहीत? विकास म्हटल की नाव येतं नितीन गडकरींच. या पुलासाठी मी त्यांचे आभार मानतो," असे म्हणत अजित पवारांनी नितिन गडकरींचं कौतुक केलं आहे.























