(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bypoll election : रोड शो, प्रचारयात्रा अन् आरोप प्रत्यारोप अखेर संपले; उद्या होणार मतदार
पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उद्या (रविवार) मतदान पार पडणार आहे तर 3 मार्चला निकाल जाहीर होणार आहे.
Pune Bypoll election : प्रचारसभा, रोड शो, प्रचारयात्रा, विविध नेते मंडळी, आरोप-प्रत्यारोप आणि एकंदरीत सगळाच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उद्या (रविवार) मतदान पार पडणार आहे तर 3 मार्चला निकाल जाहीर होणार आहे. कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini jagtap), महाविकास आघाडीचे नाना काटे (nana kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul kalate) यांच्यात तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. दोन्ही मतदार संघात मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.
270 मतदान केंद्रांवर कसबा मतदार संघातून दोन लाख 75 हजार 428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर चिंचवडमध्ये या मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून 510मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मतदार संघाचे उमेदवार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. ज्येष्ठ नेते गिरीश बापटदेखील आजारी असताना मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदार यादीत नाव कसे शोधाल?
मतदार यादी नाव शोधण्यासाठी VOter Helpline App
दिव्यांगांसाठी Pwd App यासोबतच www.ceo. maharashtra.gov.in
आणि http://electoralseasech.in या संकेतस्थळांना भेट द्या.
कसबा मतदार संघात आज भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी थेट मुख्यमंत्री मैदानात उतरले होते. शेकडो नेते, कार्यकर्ते आणि कसबेकरांच्या उपस्थित भव्य रो़ड शो आयोजित करण्यात आला होता. या रोड शो नंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. पुण्याचा विकास करणारा भाजप पक्ष आहे. त्यामुळे हेमंत रासने यांनाच मतदान करा, असं आवाहनही त्यांनी केलं. त्याच बरोबर महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनीदेखील प्रचार रॅली आयोजित केली होती. तिकडे चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini jagtap), महाविकास आघाडीचे नाना काटे (nana kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (rahul kalate) या तिघांनी धुमधडाक्यात प्रचार केला होता. अश्विनी जगताप यांनी पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला होता. नाना काटे यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या तर संपूर्ण प्रचारादरम्यान कायम मतदारांच्या भेटी घेणाऱ्या राहुल कलाटे यांनी शेवटच्या दिवशी मात्र शक्तीप्रदर्शन केलं होतं.