एक्स्प्लोर

Pune Bypoll Election : आचारसंहिता कक्षाकडून कारवाईचा धडाका! बॅनर, झेंड्यांवर कारवाई; नागरिकांना तक्रार करण्याचं आवाहन

Pune Bypoll Election :  चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे खबरदारी घेतली जात आहे. आचारसंहिता कक्षाने कारवाईचा धडाका लावला आहे.

Pune Bypoll Election : चिंचवड (Pune Bypoll Election) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे खबरदारी घेतली जात आहे. आचारसंहिता कक्षाने कारावईचा धडाका लावला आहे. आचारसंहिता कक्षाकडून सार्वजनिक जागेवरील 275 पोस्टर, 174  बॅनर्स, 3 हजार 724 झेंडे आणि फलकांसंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. 

आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी विविध पथकांमार्फत प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. निवडणुकीसंबंधी कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारांची बाब निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सर्व पथक प्रमुखांना दिले आहेत. त्यांच्या आदेशाने शहरात सगळीकडे बारीक लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे.

उमेदवारांच्या सुविधेसाठी कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना केली आहे. विविध पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार यांनी केलेल्या मागणीनुसार या कार्यालयामार्फत 16 फेब्रुवारी पर्यंत 9 सभांना परवाने देण्यात आले आहेत. तर 18 रॅली आणि मिरवणुका, 95 वाहन परवाने, 11 तात्पुरते पक्ष कार्यालय परवाने आणि 33 जाहिरात फलक परवाने देण्यात आले आहेत. सी-व्हिजील ॲपवर एकूण 12 तक्रारी प्राप्त झाल्या असून तक्रार निवारण कक्षाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जात आहे.

सी-व्हिजील’ ॲपवर नागरिकांना आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्याची सुविधा

सी-व्हिजील’ ॲपवर मतदारसंघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेमुळे अवैध बाबींवर तक्रार आणि कारवाई करणं सोपं होणार आहे. ॲप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात  तक्रारीचे स्वरुप आणि संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो. तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ॲपद्वारे मेसेज पाठवला जातो.

आतापर्यंत 52 तक्रारींचं निरसन

याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगाबाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या 52 तक्रारींचं निरसन करण्यात आलं आहे. त्यामुळे या अॅपचा वापर करा आणि कोणत्याही परिसरात काही अनुचित प्रकार सुरु असेल तर लगेच तक्रार करण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
Rohit Pawar: पुरावेच लागतात ना?, अंधभक्तांनो घ्या आता पुरावे.., रोहित पवारांचा पुन्हा खळबळजनक आरोप, थेट पुणे विद्यापीठाची प्रेसनोट दाखवली, गैरप्रकारांवर बोट
पुरावेच लागतात ना?, अंधभक्तांनो घ्या आता पुरावे.., आमदार रोहित पवारांचा पुन्हा खळबळजनक आरोप, थेट पुणे विद्यापीठाची प्रेसनोट दाखवली, गैरप्रकारांवर बोट
Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Embed widget