(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bypoll Election 2023: चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण? 'या' दोघांवर सोपवली जबाबदारी
Pune Bypoll Election 2023:चिंचवड विधानसेभेची पोटनिवडणूक (Pune Bypoll Election 2023) बिनविरोध व्हावी, असा पक्षाचा प्रयत्न आहे, असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
Pune Bypoll Election 2023: चिंचवड विधानसेभेची पोटनिवडणूक (chinchwad Bypoll Election 2023) बिनविरोध व्हावी, असा पक्षाचा प्रयत्न आहे, असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. चिंचवड (Chinchwad) विधानसेभेच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज चिंचवडमध्ये भाजपने बैठक बोलवली होती. त्यावेळी (kasba peth), त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचा भाजपचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता होती. मात्र त्यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, उमेदवार ठरण्याची प्रक्रिया आज झाली नाही, कोअर कमिटीकडून पार्लमेंटरी बोर्ड यांच्याकडून केंद्रात निर्णय होत असतो. त्यामुळे दिल्लीतून उमेदवारी जाहीर होईल. भाजपची आजची बैठक ही उमेदवार निवडीसाठी नव्हती. तर या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली की, इतर पक्षात काय चाललंय? आणि ते काय करणार आहेत? ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणाशी कशी बोलणी करणं अपेक्षित आहे, याबाबींवर यात चर्चा झाली. त्याचबरोबर गेल्यावेळी कोणत्या बुथवर कमी मतं होती, त्यात वाढ व्हावी यासाठी काय करता येईल?. सरचिटणीस मुरलीधर मोहोळ दोन्ही शहरातील कार्यकर्त्यांसोबत संपर्कात राहतील. बैठकीत कामाची विभागणी करण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रत्येक गोष्टीसाठी इच्छा असणं हा काही गुन्हा नाही. त्याप्रमाणे यासाठी अनेकांची इच्छा असू शकते. आम्ही सातत्याने सगळे आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहतो. अन्य पक्षासारखं प्रासंगिक संपर्कात आम्ही कार्यकर्त्यांशी संपर्कात राहत नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. आमदार महेश लांडगे सगळ्या इच्छूक उमेवारांशी संपर्क साधतील त्यांच्याशी संवाद साधतील, असंही ते म्हणाले. या बैठकीला आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू लक्ष्मण जगताप, पत्नी अश्विनी जगताप, मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे यांच्यासह चिंचवडचे स्थानिक भाजपनेते उपस्थित होते. या सगळ्या पोटनिवडणूकीची जबाबदारी आमगार महेश लांडगे आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. स्थानिक नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांची संवाद साधण्याचं काम ते करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जगताप कुटुंबियांना उमेदवारी मिळण्याची शक्यता..
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला सुरुवात होताच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे संपर्क कार्यालय पिंपळे गुरव येथे गर्दी झाली होती. त्यासोबतच लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनादेखील उमेदवारी मिळण्याची मोठी शक्यता आहे.